आमचा विश्वासनामा प्रत्यक्षात येणार हा जनतेला विश्वास – पराग संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराला रंगत आली आहे. भाजपा मित्रपक्षांना वाढता पाठिंबा पाहता केवळ मतदानाची औपचारिकता उरली असून आमचा ऐतिहासिक विजय जनता घडवेल असा विश्वास भाजपा मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.

प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार हे धोरण घेऊन काम करणे आमचा मूळ हेतू आहे. जनतेच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणे यासाठी आम्ही सर्व प्रभागातील उमेदवार कार्यरत असतो यामुळे जनतेत आम्हाला प्रचारादरम्यान अतिशय सकारात्मक वातावरण अनुभवण्यास मिळते आहे.

रस्ते, धूळ, आरोग्य, पाणी, स्वच्छता यासह पर्यटन आणि सुशोभीकरण असे अनेक प्रश्न आणि कामे करण्यासाठी सादर केलेला विश्वासनामा लोकप्रिय ठरला असून हजारो नागरिकांनी याबद्दल कौतुक केले आहे. यामुळे सर्वच्या सर्व तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष असा ऐतिहासिक विजय होईल असा विश्वास या प्रतिसादामुळे दिसतो आहे. सर्वच घटक आमच्याशी हक्काने जोडलेले असून अनेक वर्षांच्या सेवेचा परिपाक म्हणून विजयाचा गुलाल आमच्या अंगावर कोपरगावकर टाकतील असा विश्वास संधान यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply