कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : ज्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडवून पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडविला त्याप्रमाणेच समाजातील विविध समाजाच्या समाजबांधवांनी केलेल्या मागणीनुसार त्या त्या समाजाच्या समाजमंदिरासाठी व सभागृहासाठी निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात विविध समाजाची सभागृह आकाराला आली आहेत. त्याचा कोपरगावकरांना फायदा होत असून सभागृहाची मागणी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यापुढील काळातही नगराध्यक्षपदासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या रूपाने समाजाशी नाळ जुळलेले नेतृत्व दिले आहे. मी कोपरगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना दिली. भविष्यात काकासाहेब कोयटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करील. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता आल्यानंतर विकासाची गती अधिक वाढणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रभाग क्र. १५ मधील कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधतांना सांगितले.

आमदार काळे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने कोपरगावातील प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून सर्व समाजाच्या विकासाच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. हि जबाबदारी पार पाडतांना विविध समाजातील नागरिकांच्या मागणीनुसार समाज मंदिर आणि सभा मंडपांकरिता तसेच मस्जिद, कब्रस्तान, दफनभूमी, स्मशानभूमीच्या विकासासाठी नागरीकांच्या मागणीनुसार भरघोस निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच रस्ते, पाणी, गटारी या मुलभूत बाबी सोबतच शहराचा सर्वांगीण विकास केला आहे.

सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र येण्यासाठी, सामाजिक, सांस्कृतिक तसेच समाजाचे व नागरीकांचे छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे या उद्देशाने समाज मंदिर आणि सभा मंडप उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून समाजबांधव करत होते. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून आमदार निधीतून समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. समाज मंदिर आणि सभा मंडपांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक मेळावे, मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्रे तसेच सर्वधर्मीय सण-उत्सव साजरे केले जात आहे.

यातून समाज बांधवांमध्ये एकोपा वाढला असून कोपरगावातील सर्वधर्मीय नागरिक खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र राहत आहेत. हाच एकोपा आणि एकता टिकवून ठेवून कोपरगाव शहराला विकासाच्या बाबतीत यशोशिखरावर घेवून जाण्यासाठी जे सहकार्य २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केले तेच सहकार्य होणाऱ्या कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे व सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.


