कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीसाठीच्या प्रचार यंत्रणेच्या तोफा अखेर थंड झाल्या. प्रचाराचा गोंगाटा जरी शांत झाला तरी मतदान प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यासाठीची खास यंञणा डोळ्यात तेल घालुन कार्यान्वित झाली आहे. शासकीय यंञणा निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सज्ज झाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे,तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी माहीती दिली.

ते म्हणाले की, कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वञिक निवडणुकीसाठी सध्या एकुण मतदार – ६३ हजार ४५३ स्त्री – ३२ हजार ३१४, पु- ३१ हजार १३५ इतर ४ आहेत. ६९ मतदान केंद्रावर प्रत्येकी १ कंट्रोल युनिट व २ बॅलेट युनिट असणार आहेत. प्रभाग क्रं. १० मतदान केंद्रावर केवळ एकच मशिन असणार आहे. प्रत्येक मतदान यंञावर ३ नोटाचे बटन असणार आहेत. एका मतदाराला तीन मतदान करायचे असुन त्यात एक नगराध्यक्ष पदासाठी व दोन नगरसेवक पदासाठी मतदान असणार आहे.

शुक्रवारी राञी १० वाजता प्रचाराची अंतिम वेळ आहे त्यानंतर संबधीत उमेदवारांनी आपापले बॅनर, झेंडे, फलक व इतर प्रचाराचे मजकूर असलेले साहित्य काढून घ्यावेत त्यानंतर जर कोणाचे काही आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली तर संबधीत उमेदवाराचे भवितव्य आडचणीत येवु शकते तसेच मतदान शनिवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळत असुन मतदान केंद्रामध्ये कोणालाही मोबाईल घेवून जाता येणार नाही तसेच विना ओळखपत्र परवानगी नाही.

मतदान झाल्या बरोबर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता शहरातील सेवानिकेतन शाळेत मतमोजणी होणार आहे. तिथे एकुण १० टेबलवर ८ फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. पहील्या फेरीत प्रभाग क्र. १ व २ , दुसऱ्या फेरीत प्रभाग क्र. ३ व ४, तिसऱ्या फेरीत प्रभाग क्र. ५ व ६, चौथ्या फेरीत प्रभाग क्र. ७ व ८, पाचव्या फेरीत प्रभाग क्र. ९ व १० ,सहाव्या फेरीत प्रभाग क्र. ११ व १२ , सातव्या फेरीत प्रभाग क्र. १३ व १४ आणि आणि आठव्या फेरीत प्रभाग क्र. १५ ची मतमोजणी होणार आहे. सकळी १० ते ३ या दरम्यान संपूर्ण १५ प्रभागातील उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मतचा पुर्ण निकाल लागणार आहे. यासाठी १५० कर्मचारी कार्यरत केले असल्याची माहीती तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले दरम्यान

निवडणुकीसाठी कोपरगाव पोलीसांचा तगडा बंदोबस्त ठेवल्याची माहीती पोलीस उपाधिक्षक अमोल भारती यांनी दिली. नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोपरगाव पोलीसांनी मतदान केंद्रासह सर्वञ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे. कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक अमोल भारती यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.

पोलीस उपाधिक्षक अमोल भारती बोलताना पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार मतदान केंद्राच्या अगदी जवळ आपले बुथ लावून मोठी गर्दी करतात त्यामुळे मतदारावर दडपण येते. तसेच जवळच गर्दी झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा होण्याची शक्यता असल्याने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचने नुसार उमेदवारांचे मतदान बुथ हे मतदान केंद्राच्या दोनशे मिटर रेषेच्या पलीकडे बुथ टाकावे, उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी शंभर मिटरच्या पलिकडे ठरलेल्या रेषेत थांबावे, उमेदवारांना मतदान केंद्रात जाता येईल माञ केवळ तीन मतदारांनी मतदान करेपर्यंत मतदान केंद्रात थांबू शकतील माञ वारंवार मतदान केंद्रात लुडबुड करता येणार नाही.

मतदारांना ने आण करण्यासाठी असणारे वाहने हे दोनशे मिटरच्या रेषेपलीकडे थांबवावी वाहने मतदान केंद्रावर आणता येणार नाही जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्या राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार कारवाई करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासने तब्बल चारशेपेक्षा अधिक पोलीसांची फौज सुरक्षेसाठी तैनात केली आहे. त्यात १ अप्पर पोलीस अधिक्षक, २ पोलीस उपाधिक्षक, २५० पोलीस कर्मचारी, २५अधिकारी १२५ होमगार्ड, एस आरपी एफ व आरसीपीच्या दोन स्वतंत्र तुकड्या तैनात केल्याची माहीती दिले तसेच उमेदवार व नागरीकांनी यांना पोलीस प्रशासनाच्यावतीने शांततेचे आव्हान करण्यात आले असुन कुठेही शांतता भंग झाली तर पोलीसांशी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


