विरोधकांचा पराभव म्हणजे विकृत विचारांचा पराभव – स्नेहलता कोल्हे 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ :  कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत विरोधकांचा झालेला पराभव म्हणजे विकृत विचारांचा पराभव आहे. समोरच्या उमेदवाराच्या  प्रवृत्तीचा पराभव आहे. कोपरगावच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आहे तसेच संपूर्ण कोल्हे परिवार व भाजप मिञ पक्षावर  टाकलेल्या विश्वासाचा विजय आहे असे म्हणत स्नेहलता कोल्हे यांनी काका कोयटे यांचे नाव न घेत  निशाणा साधत माध्यमाशी संवाद साधत  पराग संधान व भाजप मिञ पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत विजयाची पहीली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

यावेळी नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार नगराध्यक्ष पराग संधान यानी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले हा माझा विजय कोपरगावच्या मायबाप जनतेला समर्पित करतो. या विजयामध्ये संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे , रेणुका कोल्हे , अमित कोल्हे यांचे मार्गदर्शन  व सहकार्य  लाभले तसेच भाजप मिञ पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने यशाला गवसणी घालता आली.

विरोधकांनी हि निवडणूक वैयक्तिक मुद्द्यावर लढवली आणि आम्ही विकासाच्या मुद्यावर लढवली म्हणुनच जनतेने आमच्या बाजूने कौल दिला. जनतेने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतील विश्वासनाम्यावर विश्वास ठेवून विजयी केल्यामुळे येत्या पाच वर्षात विश्वास नामा सत्यात उतरवणार आहोत.

शहराच्या सर्वांगीण विकासाठी  विवेक कोल्हे यांचे व्हिजन चांगले आहे त्यामुळेच त्यांना केंद्रीय व राज्य पातळीवरील बडे नेते आपलंसं करतात. दुसऱ्या टप्प्यात ही निवडणूक गेल्यामुळे आम्हाला फायदा झाला  तसेच जनमाणसापर्यंत  पोहचता आले. यापुढे दडपशाहीचे राजकारण चालु देणार नाही. विरोधकांच्या नगरसेवकांसह सर्वांना बरोबर घेवून कोपरगावच्या विकासाठी कार्य करणार आहे असे म्हणत तमाम मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले. 

Leave a Reply