कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृता सारखे असते. या सामाजिक दायित्वामुळे ‘रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊया’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजवंताला रक्ताची कमतरता पडू नये. कमतरता पडल्यास ती भरून काढण्याचा एक सामाजिक प्रयत्न या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही केला. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदाते एक सामाजिक दायित्व पार पाडत असतात.
मागील वर्षी देखील समता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध संघटना मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे या ही वर्षी रक्तदात्यांनी समता परिवार आणि इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून या ही वर्षी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन सामाजिक दायित्वाच्या बाबतीत ७८ वेळा रक्तदान करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे समता पतसंस्थेचे संचालक श्री.निरव रावलिया, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री परेश उदावंत, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे, लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष श्री.सुमित सिनगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
व्यापारी महासंघाचे श्री.अजित लोहाडे, कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा, श्री.गुलशन होडे, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, सोनतारा भन्साळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अरविंद भन्साळी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्री.संदीप रोहमारे, व्यापारी श्री.दिपक अग्रवाल श्री.राजेंद्र शिरोडे, समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड तसेच कोपरगाव तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटना व सहकारी संस्थांच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या उपस्थित राहून काका कोयटे यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी समता रक्तपेढी, नाशिक, समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कोपरगाव व राहता येथील लिंगायत संघर्ष समितीचे श्री.प्रदीप साखरे, श्री.शिवकुमार सोनेकर, श्री श्याम जंगम, श्री.अमोल राजूरकर, पदाधिकारी, सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे श्री. प्रदीप साखरे यांनी मानले.