शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव तालुक्यात महसूल विभागाची अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची महत्वाची कामे रेंगाळण्याच्या तक्रारी आहेत. शेवगाव तालुका हा जिल्हयात भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका असून या तालुक्यात महसूल विभागाचे २८ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतराची कामे सांभाळण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे ग्रामीण परिसरातील जनतेला त्यांच्या कामासाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी येण्याची व त्यानून आर्थिक भूर्दंड व वेळेचा अपव्यय सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहे त . तालुक्यात ९४ पदे मंजूर असून सध्या ६६ कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आहे. तहसीलदार छगन वाघ ३१ मेला सेवा निवृत् झाले तेव्हा पासून परिविक्षाधीन तहसीलदार राहूल गुरव प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
त्यामुळे तहसीलदारचे मुख्य पद सध्या रिक्त आहे. निवडणूक नायब तहसीलदार व संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार ही पदे अनेक दिवसा पासून रिक्त असून दोन्ही विभागाच्या अव्वल कारकुनाना कारभार पहावा लागत आहे. त्याच बरोबर अव्वल कारकूनाची ही ३ पदे रिक्त आहेत. महसूल सहाय्यकाची १० पैकी ३ पदे रिक्त आहेत. तर हजर असणाऱ्या ७ पैकी २ महसूल सहाय्यक दीर्घ काळ गैरहजर आहेत. शिपाई ३ पैकी १ रिक्त, पहारेकरी व वाहन चालक प्रत्येकी १ पद रिक्त आहेत. मंडळाधिकारी ८ मंजूर पैकी २ पदे रिक्त, तलाठी ४७ मंजूर पैकी १५ रिक्त, पुरवठा विभागातील अव्वल कारकुन, लिपिक, गोदामपाल ही पदे ही रिक्त आहेत.
एकंदरीत महसूल विभागाची अनेक पदे गेल्या अनेक दिवसा पासून रिक्त असल्याने वरिष्ठ अधिकार्याना. इतराकडून कामे करून घेतांना त्यांची दमछाक होत असल्याने महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष घालून तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरून लोकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.