शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको )या बहुराज्य सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या दिल्ली येथील एन. सी. यु. आय. इ. ऑडिटोरियम मध्ये शुक्रवारी (दि.२९ )झालेल्या विशेष आम सभेत केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये सहकार कायद्यात केलेल्या बदलाबाबत काढलेल्या आधी सूचनेवर साधक बाधक चर्चा करुन संभाव्य नविन सहकार कायदा समजून घेण्यात आला.
इफकोचे महानिर्देशक उदय कुमार अवस्थी यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आमसभेत शेवगाव येथील जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा तथा इफकोच्या संचालिका डॉक्टर रूपाली बाळकृष्ण विघ्ने तसेच अकोला येथील ताराबाई पवार या महिला संचालिकांनी उपस्थित राहून अधिसुचना समजून घेत चर्चेत सहभाग घेतला.
केंद्र सरकारने सहकार कायद्यात केलेल्या बदलास अनुसरुन संस्थेच्या पोटनियमात करावयाच्या दुरुस्त्या संदर्भात देखील यावेळी संचालक मंडळात चर्चा करण्यात आली. या विशेष आमसभेसाठी देशातील विविध राज्यातील इफकोचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.