शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पारदर्शी व शेतकरी हीत दक्ष कारभारामुळे राज्यात आग्रेसर ठरली असून, येथे आपला कांदा, कापूस व भुसार माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून बाजार समिती मध्ये ८० टनी वजन काटा बसवित असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या पूर्वीचा ४० टनी वजन काटा बदलून नव्याने ८० टनी काटा करण्याचा निर्णय समितीने घेतला. असून त्याचे फाउंडेशन कामाचा शुभारंभ ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी सभापती कसाळ बोलत होते. लोकनेते स्व. मारुत घुले यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बाजार समितीची मुहूर्तमेढ रोवली.
माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. असून यापुढील काळातही आदर्श कामाचा लौकिक कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी उपसभापती गणेश खंबरे, संचालक अशोक धस, राहुल बेडके, अनिल मडके, जमीर पटेल, नानासाहेब मडके, हनुमान पातकळ, राजेंद्र दौंड, अशोक मेरठ, अरुण घाडगे, रामजी अंधारे, मनोज तिवारी, जाकीर कुरेशी, प्रदीप काळे, सचिव म्हस्के यांच्यासह शेतकरी व्यापारी हमाल मापारी प्रतिनिधीची उपस्थिती होती.