कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : -कोपरगाव शहरात अखिल महाराष्ट्र मुद्रांक समितीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुद्रांक समितीने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहे. रक्कम रु १०० व ५०० रु स्टॅप पेपर्स बंद करु नये, वारसांना परवाने हस्तांतरीत करुन मिळावे, मुद्रांक विक्रीचे कमीशन ३ टक्के ऐवजी १० टक्के मिळावे, अथवा सेवा शुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रीची मर्यादा १० हजार रुपये वरुन १ लाख रुपये पर्यंत मिळावी, स्टॅप विक्री करीता मदतनीस ठेवण्यास परवानगी मिळावी.
भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात बदल केल्यास अथवा फ्रँकींग मशीनद्वारे विक्री करणार असल्यास ती स्टॅप व्हेंडर्स मार्फतच केली जावी, तसेच सर्व परवाना धारकांना फॅकींगसाठी आवश्यक असणारी सर्व मशिनरी विनामुल्य व विनाअट देण्यात यावी, रक्कम १००० रुपये त्यावरील छापलेले मुद्रांक विक्रीस परवानगी मिळावी, शासनाने मुद्रांकची छपाई बंद केली आहे ती त्वरीत सुरु करावी, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी.
या मागण्यासांठी राजेंद्र वाघ, सुर्यकांत टेके, प्रकाश गायकवाड, कारभारी पवार, हनुमंत मेहत्रे, श्रद्धा वाघ, बाळासाहेब लोंढे, दिलीप कानडे, शेखर रहाणे, संजय दुशिंग, दिलीप जोशी आदींनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.