संजीवनी पॉलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगाव प्रतीनिधी, दि.३० : महाराष्ट्रर राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या विषम सत्रांच्या हिवाळी परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्राचा सरासरी निकाल ९४ टक्के लागला आहे.

पाचव्या सत्राच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील वरूण रविंद्र चौधरी याने ९६. ४० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम गुणानुक्रमाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे. तसेच संजीवनी पॉलीटेक्निकने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात प्राचार्य मिरीकर यांनी वर्ष, सत्र व शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे- कंसातील आकडे हे शेकडा गुण दर्शवितात.
वर्ष तिसरे, सत्र पाचवेः सिव्हिल इंजिनिअरींग-वरूण रविंद्र चौधरी (९६.४०), प्रथम हर्षल किशोर परजणे (९५.७०), द्वीतिय व चेतन संजय गायकवाड (९१. ८०), तृतिय कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-संस्कृती दिलीप पाटील (९६.३३), प्रथम प्रियंका नवनाथ पवार (९४.७८), द्वीतिय व गौरी अरविंद लंके (९३.५६), तृतिय मेकॅट्रॉनिक्स-मयुरी सुरींदर वावळे (९४.९५), प्रथम आकांशा रुपेश  नागपुरे (९३.९०),

द्वीतिय व अथर्व भाऊपाटील गुरूळे (९३.७९), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-कौस्तुभ वाल्मिक भोसले (९२.७०), प्रथम शुभम संजय कातकडे (८९.९०), द्वीतिय व सार्थक एकनाथ कांबळे (८९.३०), तृतिय, मेकॅनिकल इंजिनिअरींग-संजना घनश्याम चांदर (८८.८६), प्रथम भावी आनंद चौहान (८७.२४), द्वीतिय पद्मश्री प्रशांत बोळीज (८६.८६) तृतिय.


 द्वीतिय वर्ष, सत्र तिसरेः सिव्हिल इंजिनिअरींग-क्षितिजा सुभाष हराळे (८७.२२) प्रथम, मृणाल श्रीप्रसाद भागवत (८३.३३) द्वीतिय व जैनम प्रशांत लोढा (८१.११) तृतिय, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-श्रावणी उमेश गायकवाड (९४.९३) प्रथम, यज्ञा उदय बोठे (९३.८६) द्वीतिय, व अनुष्का नितिन मगर आणि श्रुती रविंद्र कोल्हे (९३.४६) तृतिय. मेकॅट्रॉनिक्स-अनुष्का संतोष ससाणे (९४.३३) प्रथम,

अच्युत प्रणिल चौधरी (९१.११) द्वीतिय व कावेरी श्रीरंग ब्राम्हणे (९०. ११) तृतिस. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-प्रियंका संजय वाघ (९०.२५) प्रथम, कृष्णा शशिकांत लोखंडे (८४.८८) द्वीतिय व निखिल संतोष पवार (८४.७५) तृतिय. मेकॅनिकल इंजिनिअरींग-प्रिती विजय नाईकवाडी (९२.६३) प्रथम, ओमकार दिलीप मोरे (८६.५३) द्वीतिय व साक्षी नवनाथ वर्दे (८४. २ ) तृतिय.

 प्रथम वर्ष, सत्र पहिले: सिव्हिल इंजिनिअरींग-सनी कुमार (८८.८२) प्रथम, श्रावणी सतीश सोंजे (९९.१२) द्वीतिय व देविदास बापु खाळणे (८४.३७) तृतिय. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-हितेन समिर शाह (९३.६५) प्रथम, स्तिमीत सतीश आढाव (९२.७१) द्वीतिय व शुभम प्रकाश पवार (९२.५९) तृतिय. मेकॅट्रॉनिक्स-ट्विंकल हरेश चौधरी (९३.७७) प्रथम, वैष्णवी बाबासाहेब मापारी (९२.८२) द्वीतिय व प्रतिक्षा किसन पवार (९०.३५) तृतिय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- गणेश सुनिल वाघ (८३.४१) प्रथम, योगेश रामदास तुरकणे (८२.९४) द्वीतिय व नंदिनी सचिन मगर (८२.८२) तृतिय.

मेंकॅनिकल इंजिनिअरींग-प्रथमेश  लकारे (९२) प्रथम, श्रेयश नारायण शिंगारे (८८.३५) द्वीतिय व अक्युसा बद्रूदिन शेख (८४.२४) तृतिय. प्रथम ते तृतिय वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी काही विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.