शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : मराठा आरक्षणाच्या प्रबोधनासाठी व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वांबोरी ( जि.अहमदगनर ) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी ते शेवगावातून जात असतांना त्यांनी सकल मराठा समाज समितीच्या पदाधिकारी व नागरीकांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांचे शहरामध्ये ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक ठिकाणी दौरा आयोजीत केला आहे. यावेळी वांबोरी व पारनेर येथे शनिवारी (दि .२३ ) रोजी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी जरांगे हे शेवगाव – मिरी मार्गे वांबोरीकडे जातांना त्यांचे शहरात आगमन होताच आंबेडकर चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पु्ष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी बापुसाहेब गवळी, विजय देशमुख, संजय फडके, विष्णू घनवट, निलेश बोरुडे, शरद जोशी, सर्जेराव तानवडे, माऊली खबाले, किशोर कापरे, गोटू घनवट, आदिनाथ कापरे, कृष्णा सातपुते यांनी त्यांचे स्वागत केले. तर काकडे विदयालयासमोर चंद्रकांत लबडे, सिध्दार्थ काटे ,अमोल भवार, दादा रसाळ,कल्याण घोणे, सनी शिंदे, साम साळुंके, रोहीत पायघन, शंकर मुळे, सुरेश कोरडे, देविदास लबडे, दादा शितोळे, मंगेश म्हस्के आदींनी त्यांचे स्वागत केले.