कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : चाळीस वर्षात केंद्रात व राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मागील साडे चार वर्षात आला आहे. हा निधी झालेल्या व होत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेला दिसत आहे. जनता या विकास कामांवर खुश देखील आहे. सर्व प्रकारची सत्ता असतांना ४० वर्षात त्यांना जे जमल नाही ते आ.आशुतोष काळे यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे यापुढे आपली दाळ शिजणार नाही याची त्यांना चिंता सतावत असतांना स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुका नसतांना दोन जबर झटके बसले आहे. मात्र या दोनच झटक्यात आत्ताच संतुलन बिघडवू देवून नका असा उपरोधिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.
ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टिकेचा खरपूस समाचार घेतांना सुधाकर रोहोम यांनी असे म्हटले आहे की, दुखत कुठे आणि सांगता कुठे तुमच्या या भावना जनतेच्या लक्षात आल्या आहेत आणि आम्ही देखील समजून घेतल्या आहेत. मात्र एका जागेवर बसून गप्पा हाणू नका. गेस्टहाऊस मध्ये एका जागी बसून विकास होत नसतो. नेत्याने जनतेच्या सुख दु:खात सहभागी व्हावे लागते. त्यामुळे मनही रमते आणि वेड्या वाकड्या गोष्टी देखील मनात येत नाही असा सल्ला रोहोम यांनी दिला आहे.
जनता त्याच नेत्याला बोलाविते जो नेता जनतेच्या सुख दु:खात नेहमी सहभागी असतो. तुम्हाला चाळीस वर्ष सत्ता देवून देखील तुम्हाला रोजगार निर्मिती करता आली नाही त्यामुळे कित्येक नागरिक व्यवसायाकडे वळले, ते तुम्हाला देखवत नाही.त्यांना शुभेच्छा दिलेल्या तुम्हाला आवडत नाही. याचे माझ्यासह सर्व उद्योग व्यावसायिकांना नक्कीच दु:ख वाटले परंतु तुम्ही किती कोत्या मनाचे आहात हे देखील यावरून दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीचा माहोल नसतांना जवळचे कार्यकर्ते वैतागून सोडून जात आहेत. हे दोन धक्के त्यांना सहन न झाल्यामुळे स्वप्न पडल्यागत पाप धुण्याची भाषा करीत असले तरी मात्र आत्ताच संतुलन बिघडवू देवून नका सबुरीचा सल्ला देतांना गेस्टहाऊस मध्ये बसणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी तीनशे कोटी व तीन हजार कोटीचा फरक अगोदर समजून घ्यावा चाळीस वर्ष एकत्र केले तर तीन हजार कोटी होत नाही याचे देखील तुम्हाला दुख आहे. मात्र या दु:खापोटी आमदारांच्या वडिलांवर टीका करणे कितपत योग्य आहे?
आ.आशुतोष काळे यांच्या वडिलांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील दोन पंचवार्षिक केलेला विकास तुम्ही पहिला आहे जनतेने देखील पहिला आहे हे तुमच्यासाठी पुष्कळ आहे. तुम्ही जरी वैतागातून आमदारांच्या वडिलांवर बोलला परंतु एकीकडे खडा टाकायची व जल समाधी घ्यायची भाषा करायची व पाणी सोडण्यासाठी स्वत:च गेट उघडायला पुढे जायचे या चुकांबाबत आ.आशुतोष काळे बोलणार नाहीत कारण ते जनतेला माहित आहे आणि ज्या व्यक्ती आज आपल्यात नाहीत त्यांच्या बद्दल बोलणे देखील उचित नाही.
मात्र हे समन्यायीचे बाळ देखील तुमचेच पाप आहे हे विसरू नका. योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा सविस्तर खुलासा आ.आशुतोष काळे हे तुम्हाला देतीलच तोपर्यंत अजून धक्के सोसण्याची मानसिकता करून घ्या व यापुढील काळात जरी जून काही धक्के बसले तरी आपला संयम मात्र ढळू देवू नका अजून धक्के तुम्हाला पचवावेच लागतील असा सल्ला शेवटी दिला आहे.