कोल्हे कुटुंबियांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ :  सहकार महर्षी, माजी मंत्री शंकररावजी गेणूजी कोल्हेसाहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे समाज्यातील बंधुत्व, समता, ह्या विचारांचा अंगीकार केला, या मूल्यांचे जतन करण्याची शिकवण दिली. या मूल्यांची जोपासना करून सामाजिक ऐक्य जपत रमजान ईदच्या निमीत्ताने कोल्हे परिवारातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जाऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. 

  रमजान ईदच्या निमीत्ताने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी  कोपरगाव शहरातील कोर्टाजवळील ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देऊन संवाद साधला. तर कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी येसगाव येथे जात मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत, शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.

 तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगावातील हनुमाननगर भागात जाऊन मुस्लिम बांधवांशी संवाद साधत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तर चविष्ट रुचकर अशा शिरखुर्म्याचा मनस्वी आनंद घेतला. 

 स्व.कोल्हे साहेबांनी गेल्या ४० वर्षाच्या समाज कार्यात धार्मिक एकोपा ठेवला होता. त्याच्या हयातीमध्ये रमजान ईदचा एक उत्साह असायचा. तोच उत्साह हा बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व  विवेक कोल्हे यांनी जपत यंदाची मुस्लिम बांधवांची रमजान ईद मोठया आनंदात साजरी झाली याचा आनंद मुस्लिम बांधवानी व्यक्त केला. 

              या प्रसंगी श्री. पराग संधान डि. आर. काले, राजेंद्र सोनवणे, जनार्दन कदम, प्रदिपराव नवले, विजयराव आढाव,गोपीनाथ गायकवाड, समीर गवळी, सतिश रानोडे, सचिन सावंत, डॉ. अनिल जाधव, गोरख देवडे, प्रभुदास पाखरे, शंकर बिऱ्हाडे, सुजल चंदनशिव, दिपक जपे, खालिकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान, अरिफभाई कुरेशी, श्री.शाहरुख शेख, अमिन शेख, हशमभाई शेख,रोहन दरपेल, सादिकभाई पठाण, जितेंद्र रणशुर,श्री. शफिकभाई सैय्यद, दिपक वाजे,रवींद्र रोहमारे, साईनाथ त्रिभुवन, जितेश  बत्रा, विनय भागवत, अकबरभाई शेख, इलियासभाई शेख, सद्दामभाई सैय्यद, राजु पठाण, वाहिदभाई पठाण, जगदिश मोरे, राजेंद्र बागुल, प्रसाद आढाव, संजयराव आढाव,

गणेशराव आढाव, कैलास शेळके, मौलाना हाजी आसिफ कुरेशी, मौलाना रियाझ सर, राजेंद्र भंडारी, शरदनाना थोरात, प्रकाश शेळके नसीरभाई सय्यद, सद्दामभाई सय्यद, अल्ताफभाई कुरेशी, फिरोजभाई पठाण, अल्ताफभाई पठाण, जुबेरभाई खाटीक,अकिलभाई मेहंदी, नुरखाँभाई पठाण, रवींद्र पाठक, भाजयुमोचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, अविनाश पाठक, सोमनाथ म्हस्के, रोहित कणगरे,स्वप्नील मंजुळ, रुपेश सिनगर, हरूण पठाण, लखन म्हस्के, आदींसह मुस्लिम बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.