संजीवनीचे नऊ अभियंते बेंटेलर ऑटोमोटिव्हच्या सेवेत हजर                                   

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ४ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभाग वेगवेगळ्याा कंपन्यांच्या सपर्कात राहुन त्या कंपन्याना कोणते आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंतेे पाहीजे, याचा अभ्यास करून आपल्या अभियंत्यांना प्रशिक्षण देतो. टीअँड पी विभागाला प्रतिसाद देत बेंटेलर ऑटोमोटिव्ह प्रा. लि. या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते.

यात कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या अंतिम वर्षातील  नऊ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली व हे अभियंते त्यांच्या अंतिम निकाला अगोदर कंपनीच्या सेवेत हजरही झाले, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

वेगवेगळ्या  वाहनांसाठी चेसिस उत्पादन करणाऱ्या  बेंटेलर ऑटोमोटिव्ह प्रा. लि.या जर्मन कंनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये गणेश मनोहर अभिनव, बसवराज कमाजी चंदनकर, गणेश  पंढरीनाथ दिघे, अशोक  बाळासाहेब जांभळे, राज सुधिर पाटील, सतीश अंकुश  पिसे, शुभम गोरक्षनाथ शिंदे, कृष्णा  अशोक  वाघ व सुयश  दिलीप गावडे यांचा समावेश आहे.

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा असल्यामुळे वेगवेगळ्या उद्योगांना अभिप्रेत असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  असलेला अभ्यासक्रम शिकविण्यात येतो, यामुळे मोठ्या प्रमाणावर नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे व डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर यांचे अभिनंदन केले.

 मी तिसगाव ता. पाथर्डी येथिल रहिवासी आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देवुन हमखास नोकरी मिळवुन देते, याची मला माहिती होती म्हणुन मी संजीवनी मध्येच प्रवेश  घेतला. माझ्या शाखेचे  मला सखोल ज्ञान तर मिळालेच, परंतु संभाषण कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा, इत्यादी बाबींचे प्रशिक्षणही मिळाले. मुलाखतीच्या अगोदर टी अँड  पी विभागाने आमची भरपुर तयारी करून घेतली. यामुहे बेंटेलर ऑटोमोटिव्ह प्रा. लि. च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मी सहज उत्तिर्ण झालो, आणि आता कंपनीच्या सेवेतही हजरही झालो. माझे नोकरीचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण झाले.-अभियंता गणेश  अभिनव.