भारताने टी २० क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय क्रिकेट संघावर लागले होते टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला आणि कर्णधार रोहित शर्मा याने बुद्धीच्या जोरावर संघातील सर्व खेळाडूंच्या सहकार्याने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत या विश्वचषकावर भारत देशाचे नाव कोरून इतिहास रचला अशा शब्दात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.   

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या अक्षर पटेल, शिवम दुबे गोलंदाज जसप्रीत बुमरा, अर्श दीप सिंग या खेळाडूं बरोबरच प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे स्मरण १५० कोटी देशवासियांना सतत होत राहील.

  कोल्हे पुढे म्हणाले की,  आपल्या देशातील खेळाडूंनी भारताचे नाव जगात उज्वल केले आहे.  विश्वचषकावर भारताचे नाव कोरल्यानंतर देशात सर्वत्र दिवाळी साजरी झाली. क्रिकेट खेळाला सध्या युवकांचा मोठा प्रतिसाद आहे.  सांघिक भावनेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते निश्चितच नावलौकिकास्पद कामगिरी करू शकतात याचे मूर्तीमंत उदाहरण आपण सतत अनुभवलेले आहे. 

            सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू विराट कोहली याने त्याच्या निवृत्ती निमित्त देशाला टी 20 चे विश्वविजेतेपद बहाल करून मोठा किताब दिला आहे, रोहित शर्मा याचे कर्णधार पदाचे अष्टपैलू गुण युवा पिढीतील नवोदित क्रिकेटपटूंना अभ्यासणेजोगे आहे. खेळत नैपुण्य ठेवलं की पराजय देखील विजयामध्ये परावर्तित होत असतो.  खेळामुळे प्रत्येकामध्ये व्यायामाची कला आत्मसात होते तेव्हा युवा पिढीने जास्तीत जास्त खेळांवर भर द्यावा असेही विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.