संत ज्ञानेश्वर स्कूलमध्ये डॉक्टर्स दिन व कृषी दिन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम शाळेत सोमवारी डॉक्टर्स डे व महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. बी.सी. रॉय व कृषी क्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली आणि डॉक्टरांचे व शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी  कोपरगावचे सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.कुणाल घायतडकर व भाग्यश्री घायतडकर होते. 

या वर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन २०२४ ची थीम ‘हीलिंग हँड्स, केअरिंग हार्ट्स’ आहे. ही थीम डॉक्टरांच्या समर्पणावर भर देते. आयुष्यभर लाखो लोकांचे जीव वाचवण्यात डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे. हे त्यांच्या कार्याचे कौतुक करते आणि मानवी जीवनातील डॉक्टरांच्या भूमिकेचा सन्मान करते. डॉक्टर्स डे निम्मित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे डॉ.घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. कुणाल घायतडकर व डॉ. भाग्यश्री घायतडकर यांच्या द्वारे मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन विद्यार्थी व शिक्षकांसाठी करण्यात आले होते.

या मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी तपासणीचा लाभ घेत त्यांचे दात तपासून घेतले. तसेच कॅन्सर कंट्रोल मिशन,मीरा रोड,मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी जुगल नामदेव यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपले आरोग्य कसे जपावे या बद्दल मार्गदर्शन केले. शाळेच्या शिक्षिका भारती हळगावकर व उमा गिरमे यांनी डॉक्टर डे व कृषी दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले व शाळेतील विद्यार्थिनी कु. भक्ती देवडे हिने सांगितले की डॉक्टर हे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत, पण आमच्या पिढीसाठी ते खरे हिरो आहेत.

कोविड दरम्यान महामारी, एखाद्या अदृश्य शत्रूविरुद्ध हॉस्पिटलमध्ये लढले गेलेले महायुद्ध असे वाटले. तसेच इय्यता १० वी ची विद्यार्थिनी कु.श्रद्धा शिंदे हिने सांगितले की सेंद्रिय शेती जैवविविधतेला प्रोत्साहन देते आणि कृत्रिम कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी करते. हानिकारक रसायने टाळून, सेंद्रिय शेतकरी निरोगी मातीची परिसंस्था राखण्यास, पाण्याच्या गुणवत्तेचे रक्षण करण्यास आणि वन्यजीवांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास मदत करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी केले, सूत्रसंचालन शिक्षिका चैताली पुंडे व रुपाली आढाव यांनी केले तर आभार मंगल वैराळ व अनिता खरात यांनी मानले.