कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असणारी कोपरगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयतील कर्तव्यदक्ष शिक्षक रमेश गायकवाड यांची शाळेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याची माहिती कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे यांनी दिली आहे.
कोपरगाव येथील सन १९३४ च्या कालखंडामधील शिक्षण क्षेत्रातील नामांकित असणार्या तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक मकरंद कोर्हाळकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर संस्थेतील ३२ वर्ष शिक्षण सेवा देणारे रमेश बाबुराव गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.
गायकवाड यांचे संस्थेसाठी मोठे योगदान असून त्यांच्या या कामाची दखल घेऊन संस्थेने रमेश गायकवाड यांना मुख्याध्यापक पदी विराजमान केले असून या निवडिबद्दल स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, संस्थेचे सहसचिव सचिन अजमेरे संस्थेचे सदस्य संदीप अजमेरे, राजेश डोळे तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे, शाळेचे अधिक्षक नितीन जाधव, सुरेश गोरे, दिलिप तुपसूंदर आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.