शेवगाव प्रतिनिधी दि. २० : शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात सुरु केलेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते व शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी अरुण मुंढे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र दिल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते अरुण मुंढे यांनी जल ग्रहण करून हे उपोषण मागे घेतले.
काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी उपोषण स्थळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जागरण गोंधळाच्या माध्यमातून शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात व्यंगात्मक टीका करण्यात आली. यावेळी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा तहसील कार्यालयमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आनंद घेतला.
शेवगाव नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात येईल. तत्कालीन शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणी योजनेचे कन्सल्टन यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची, डिपीआर नवीन तयार करण्यात येणार आहे. कचऱ्या संदर्भात टेंडर तत्काळ काढण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये २०० लाईट तत्काळ बसवण्यात येणार असून हायमॅक्स लाईटचे टेंडर तात्काळ काढण्यात येणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे शेवगाव पाणीपुरवठा योजने बद्दल ९० दिवसांच्या आत कामाला सुरुवात करू असे लेखी आश्वासन प्रांताधिकारी मते यांच्याकडून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी आपले उपोषण मागे घेतले.