कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : मतदारसंघाच्या वैभवात भर पाडणाऱ्या वाचनालय, बस स्थानक, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगरपालिका या इमारतीसाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निधी मिळवला होता. एक महिला लोकप्रतिनिधी असताना अनेक विरोधक एकत्र येऊन विकास कामे अडवण्याचा प्रयत्न करत होते. कोल्हे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहे त्याची अप्रत्यक्ष कबुली विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार काळे यांचे कार्यकर्ते जाहीर देत असल्याने कोल्हे यांचे योगदान त्यांनाही मान्य असल्याची जोरदार चर्चा कोपरगाव मतदारसंघात रंगली आहे अशी टीका ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष जगदीश मोरे यांनी केली आहे.
हजारो कोटींच्या व्हॉट्स अपवर वल्गना करणारे आमदार काळे तर दुसरीकडे जो वास्तविक निधी प्राप्त झाला त्याची सत्यता जनतेला सांगून काम करणाऱ्या सौ.स्नेहलताताई कोल्हे असे चित्र आहे. बाजार ओटे, गोकुळनगरी पुल, शहरातील हद्दवाढ भाग, नवीन अग्निशामक केंद्र ही कामे देखील कोल्हे यांनीच मार्गी लावल्याचे जनतेला ठाऊक आहे. शहरात शासकीय इमारती वैभवात भर पडत असल्याची भावना आमदार काळे यांचे पदाधिकारी व्यक्त करत असल्याने त्यांनाही सौ.कोल्हे यांनी केलेल्या कामाची जाणीव उशिरा का होईना झाली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
स्वतःचे संपूर्ण योगदान असलेले एकही काम आमदार काळे यांना दाखवता येत नसल्याने सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळातील कामांचे श्रेय घेण्याची वेळ काळे यांच्यावर आली आहे.
आमदार काळे यांना स्वतः प्रयत्न करून ठोस काम करता आले नाही. कोल्हे यांनी निधी मिळवलेल्या इमारतींचे श्रेय घेण्याची दुर्दैवी वेळ काळे यांच्यावर पाच वर्षे संपताना आली आहे. आपल्या नेत्याने ठोस काम न केल्याने केवळ राजकीय अडचण म्हणून कोल्हे यांचे नाव घेऊन कौतुक करता येत नसल्याने काळे यांचे नाव घेण्याची मजबुरी काळे यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्री महोदयांच्या हस्ते कोल्हे यांनी निधी मिळवलेल्या इमारतींचे उद्घाटन करून घेण्याची नामुष्की काळे यांच्यावर आली होती.मतदारसंघात असंख्य प्रश्न जैसे थे असल्याने काळे अपयशी ठरल्याची भावना सर्वत्र आहे. एकीकडे ज्या इमारतींवर टीका केल्या त्यांचे श्रेय घेण्यासाठी मात्र धडपड काळे यांना करावी लागणे हे हास्यास्पद आहे असे मोरे म्हणाले आहेत.