रवंदे येथील पाणी योजनेचे भूमिपूजन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वकांक्षी धोरण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या माध्यमातून कोपरगांव मतदारसंघातील रवंदे येथील जलजीवन मिशन योजनेच्या ८ कोटी ११ लक्ष २९ हजार ३०८ रुपये निधीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून आरोग्य आणि नागरी सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन हर घर जल ही मोहीम सर्व देशभरात राबिण्यात येत आहे.या अंतर्गत जल जीवन मिशन ही धाडसी मोहीम हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळणे हा त्याचा मानवी अधिकार आहे.यासाठी अमुलाग्र बदल करून जल हैं तो कल हैं या दृष्टीने प्रत्येक घरापर्यंत नळाद्बारे पाणीपुरवठा करण्यास कटिबध्द प्रशासन धोरण राबविले जाते आहे.

देशातील शेवटचा घटक हा राष्ट्राची प्रेरणा आणि ऊर्जा असतो.त्या घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून तळागळातील शेवटच्या घटकाची तहान भागवण्यासाठी संकल्प तडीस घेऊन जाणारे पंतप्रधान देशाला लाभले.सत्ता हे सर्वस्व न मानता सामान्य नागरिक हा सर्वोच्च मानून देशवासीयांच्या आयुष्यात आपण काय चांगले बदल घडवून आणू शकतो,दैंनदिन भेडसावणाऱ्या समस्या कशा हद्दपार करू शकतो यासाठी कार्यरत असणारे देशभक्त पंतप्रधान आपल्याला लाभले याचा अभिमान आहे असे विचार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मनोगतातून व्यक्त केले.

देशात वीज,पाणी,आरोग्य आणि रोजगार यासाठी गतिशिल कार्य नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात होते आहे. कोपरगाव मतदारसंघात २८३ कोटीहून अधिक निधी जल नियोजन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिला आहे.मतदारसंघात विविध गावांसाठी ही योजना अमृतवेल ठरली असून आगामी काळात बहुसंख्य भागातील पाणी प्रश्न यामुळे सुटणार आहे.रवंदे या गावातील महिला,अबाल वृद्ध यांना स्वच्छ पाण्याची उलब्धता होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही योजना ऐतिहासिक ठरणार आहे असे प्रतिपादन सौ.कोल्हे यांनी यावेळी केले.

“उपसरपंच संदीप विठ्ठल कदम यांनी स्व. मालकीची जागा पाण्याच्या टाकी करीता मोफत बक्षिसपत्र करून दिली आहे त्याबद्दल सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचा विशेष सन्मान करून या सामाजिक सहकार्याच्या भूमिकेचे स्वागत करून अभिनंदन केले.”

या प्रसंगी साहेबराव कदम, शिवाजी कदम, अंबादास कदम, निवृत्ती कदम, सरपंच भानुदास भवर, पोपटराव भुसे, ज्ञानदेव भुसे, विठ्ठल मढवई, साहेबराव लामखडे, भानदास कंक्राळे, शशिकांत सोनवणे, केशव कंक्राळे, राधाकीसन कंक्राळे, सुभाष कंक्राळे, प्रवीण कदम, शोभा भवर, लता मोरे, कांताबाई मढवई, सरिता पवार, ऋषिकेश कदम, बाळासाहेब निमसे, ललित सोनवणे, अरुण सोनवणे, दीपक कदम, संदीप कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.