ब्राह्मणगाव बस नियमित सुरू करण्याची ‘शिवसेने’ची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : कोरोना काळापासून बंद झालेली ब्राह्मणगाव एसटी बस पुन्हा नियमितपणे सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) निवेदनातून कोपरगाव आगार प्रमुख बनकर यांच्याकडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावचे उपतालुकाप्रमुख कैलास आसने यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की ब्राह्मणगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असूनही एकही बस तेथे जात नाही. कोरोना काळापूर्वी 12 वाजेच्या सुमारास कोपरगाव आगारातून बस जात होती. परंतु, कोरोनात बंद झालेली ही बस अद्यापही सुरू केलेली नाही. यामुळे वृद्ध नागरिक, सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. यामुळे लवकरात लवकर दोन फेऱ्या बस सुरू करा. अन्यथा शिवसेना स्टाईलने उपोषण करण्याचा इशारा कैलास आसने, निलेश चौधरी, अक्षय जाधव, सनी गायकवाड, शंकर मोटे, भारत कुऱ्हाडे, संतोष पवार, अशोक नायकुडे आदींनी दिला आहे.