स्वत:च्या रक्ताने आमदार काळेंची प्रतिमा तयार करून वाढदिवसाची दिली भेट

रक्तापलीकडे नातं जपणारा काळेंचा कार्यकर्ता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : नातं मैञीच असतं, नातं जिव्हाळ्याचं असतं, नातं रक्ताचं असतं.  पण एखाद्या नेत्या बद्दलच नातं तर केवळ एकमेकांचा फायदा घेण्यासाठीच असतं हे बहुतांश ठिकाणी ऐकून आहोत. माञ कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रति एका कार्यकर्त्याच नातं तर रक्ता पलिकडच आहे. आपल्या नेत्या प्रति असलेले नांत रक्तापलिकडचं आहे म्हणून कोपरगाव शहरातील राघोबादादा वाडा परिसरातील अमोल देवकर या २४ वर्षीय युवकाने आमदार आशुतोष काळे यांच्या  वाढदिवसा निमित्ताने चक्क स्वताच्या रक्ताने आमदार आशुतोष काळे यांची प्रतिमा रेखाटून त्यांना प्रत्यक्ष भेट दिली.

 आमदार काळे यांचा ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आमदार काळे आले होते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांची  तोबा गर्दी होती. सकाळी ८ वाजल्यापासून दिवसभर गर्दी सूरु होती. या तुफान गर्दीत रक्ता पलीकडे नातं जपणारा सामान्य कार्यकर्ता अमोल देवकर ही  कार्यकर्ता आमदार काळे यांना रक्ताची प्रतिमा तयार करुन काळे यांना भेट दिली.

अमोल देवकर यांच्या समवेत त्यांचे सहकारी अनिकेत पवार, संदीप देवळालीकर, सोमनाथ शिंदे, सोयब शेख, शाम शिरसाठ आदी कार्यकर्त्यांनी एकञ मिळून शुभेच्छा देत प्रतिमा भेट दिले. प्रचंड गर्दीत  आमदार काळे यांच्या लक्षात आले की नाही माहीत नाही पण आपलं आपल्या नेत्या प्रति रक्ता पलिकडे  किती  मोठं नातं आहे याचं मनोमन समाधान अमोल  देवकर याला वाटले. 

 लहानपणापासून काळे परिवाराशी नातं असलेला अमोल देवकर हा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात गेल्या तीन वर्षांपासून कामाला आहे. अतिशय सामान्य कार्यकर्ता असुनही आमदार काळे यांच्याशी माझं  नातं रक्ता पलिकडे एकनिष्ठ आहे अशी प्रतिक्रिया अमोल देवकर याने दिली. 

 दरम्यान आपल्या नेत्याला  त्यांच्या वाढदिवसाची आगळी वेगळी भेट देण्यासाठी अमोल देवकर याने नामी शक्कल लढवली.  डॉ. सी. एम. मेहता कन्या शाळेतील कला शिक्षक अमोल निर्मळ यांच्याशी संपर्क साधुन आमदार काळे यांची प्रतिमा रेखाटण्याची विनंती केली. निर्मळ यांनी पेन्सिलने आमदार आशुतोष काळे यांची प्रतिमा हुबेहूब रेखाटली त्याला रंगकाम करणार इतक्यात अमोल देवकर याने हि प्रतिमा रक्ताने  रेखाटण्याची विनंती केली.

रक्त तपासणीसाठी वापरणाऱ्या बोटलमध्ये आपलं रक्त काढून चिञ रंगवण्यासाठी दिले. चिञकार निर्मळ यांनी रक्ताने आमदार आशुतोष काळे यांचे चिञ एका दिवसात हुबेहूब रेखाटून तयार केले. सच्चा नेत्यांसाठी सच्चा कार्यकर्ता कसा असतो याची अनुभूती चिञ रेखाटणाऱ्या निर्मळ यांना आली. तर आपल्या नेत्यांची प्रतिमा आपल्या रक्ताने कशी रेखाटली यांचा आनंद झाला. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाची ही  अनोखी भेट लक्षवेधी ठरली. नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील रक्तापलिकडच्या नात्याची चर्चा तालुक्यात रंगली.