विविध मागण्यांसाठी शेवगावात एस.टी. कामगारांचा संप

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : महाराष्र्ट राज्य एस.टी. कामगार संयुक्त कृती समीतीच्या वतीने महाराष्र्ट राज्यभर मंगळवार ( दि ३) पासून संप सुरु झाला. त्यामुळे शेवगाव आगारातून एकही बस आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे रात्रंदिवस गजबजलेल्या शेवगाव बस स्थानकात शुकशुकाट होता. एसटीच्या बंदमुळे आज शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तसेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने रोज बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.

राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतन वाढीच्या दराची थकबाकी त्वरीत द्यावी, एस.टी.कर्मचारी व कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळावी, सुधारीत जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपध्दतीमध्ये बदल करावा, आदी प्रमुख मागण्यासाठी महाराष्र्ट राज्य एस.टी. कामगार कृती समीतीच्या वतीने धरणे आंदोलन सुरु केले आहे. शेवगांव आगारातून आज एकही बस सुटली नाही. 

यावेळी एस.टी. कामगार कृती समितीचे अध्यक्ष संजय नांगरे, दिलिप लबडे, पांडुरंग देशमुख, जे टी पवार, राजेंद्र घुगे, संजय धनवडे, भाऊसाहेब लींगे, काकासाहेब जाधव, अरुण गर्जे, प्रकाश खेडकर, रमेश गोसावी, शेषराव देशमुख, ईसमाईल पठाण, राज आकाकडे, निलेश पालवे, शेषराव झेंड, सचिन कळंबे, प्रविण गरोटे, सचिन सिरसाठ, भगवान दहिफळे, महादेव तेलोरे, प्रविण बुधवंत, लक्ष्मण लव्हाट आदीसह एस.टी. कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.