शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : तिसगाव ते पैठण राज्यमार्ग होणार सिमेंट काँक्रेट हॅम मॉडेल अंतर्गत २०५ कोटींच्या ४२ किलोमीटर अंतराच्या कामास लवकरच सुरवात होणार असल्याने या रस्त्याची दैना नाहीशी होणार असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी येथे दिली.
गेल्या काही वर्षापासून तिसगाव ते पैठण रस्ता वाहतुकीस अत्यंत खडखड झाला होता. वाहनांसह प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला तर पैठण पर्यंत प्रवासास वेळ लागत असे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविने आणी परत खड्डे होणे हे ठरलेलेच होते. यामुळे काही आरोपही केले गेले. गत वर्षी पैठण, तिसगाव, गेवराई, नेवासा या राज्य मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रवासाचा त्रास कमी झाला. मात्र मतदार संघात शेवगाव शहरातुन जाणारे रस्ते पक्के व्हावेत यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांचे सतत प्रयत्न सुरू होते.
आमदार राजळे यांची शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या हद्दीतील तिसगाव, अमरापुर, शेवगाव, पैठण, अंबड, नांदेड, धर्माबाद ४२ कि.मी. प्ररामा.८ ते वाबोंरी, खोसपुरी, मिरी, माका, शेवगाव रामा ५२ हा ४२.६०० कि.मी. आणी शहापुर, संगमनेर, श्रीरामपुर, नेवासा, शेवगाव, माजलगाव रामा. ५० हा ४९.२०० कि.मी. हे रस्ते हॅम मॉडेल अंतर्गत मजबुत करण्याची शासनाकडे मागणी होती. त्यानुसार या मार्गांचा सर्व्हे करण्यात आला.
यापैकी तिसगाव, अमरापुर, पैठण राज्यमार्ग क्रं.६१ मार्गाच्या कामास फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजुरी मिळाली. २०५ कोटी ६० लक्ष रुपये खर्चाच्या ४१.८०० कि.मी कामाची जुलै २०२४ मध्ये टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सदर काम हे एस.ए.सांवत कंपनी नाशीक यांना मिळाले असुन १५ दिवसात काम आरंभ होण्याचा आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्यता आहे.
राज्य महामार्ग २२२ तिसगाव ते अमरापुर, शेवगाव, पैठण राज्यमार्ग ६१ असा ४१. ८०० कि.मी हा मार्ग संपुर्ण सिमेंट काँक्रेटमध्ये १० मिटर रुंदीचा होणार आहे. यामधील असणाऱ्या छोट्या मोठ्या नदी नाले वरील पुलांचे बांधकामही होणार आहे. तर शेवगाव शहरात दत्त मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यापासुन नित्यसेवा हॉस्पिटल पर्यंत दुभाजक बसविले जाणार आहेत. हा रस्ता सिमेंट काँक्रेटचा होणार असल्याने सुखकर प्रवासाबरोबर मार्गालगत व आसपासच्या गावांतील बाजारपेठ वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार राजळे म्हणाल्या.