शहादेव पातकळ यांची केदारेश्वरच्या संचालक पदी निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी शहादेव पातकळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी संचालक पांडुरंग  काकडे यांचे निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या  रिक्त झालेल्या  जागेवर पातकळ यांची निवड करण्यात आली आहे.     

या जागेवर नवीन संचालकाची निवड करण्यासाठी आज मंगळवारी  कारखाना कार्यस्थाळवार नेवासेचे सहाय्यक निबंधक तथा प्राधिकृत अध्यासी आधिकारी देवीदास घोडेचोर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक बोलवली होती. यावेळी शहादेव पातकळ यांनी संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या एकट्याचाच अर्ज आल्याने प्राधिकृत अध्यासी आधिकारी  घोडेचोर यांनी त्यांना बिनविरोध घोषीत केले. पातकळ यांच्या नावाची सुचना संचालक रणजीत घुगे यांनी मांडली त्याला संचालक सुभाष खंडागळे यांनी अनुमोदन दिले.

      चेअरमन ऋषीं केश ढाकणे यांनी नवनिर्वाचित संचालक पातकळ यांचा सत्कार केला. तर संचालक ॲड. प्रताप ढाकणे यांनी   घोडेचोर यांचा सत्कार केला. निवड प्रक्रियेसाठी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासन अधिकारी पोपट केदार, विकास भिसे, बप्पासाहेब आंधळे यांनी सहकार्य केले.