आलटून पलटून सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवा – हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : आपल्या मतदारसंघाचे आजूबाजूचे तालुक्याचा विकास झाला. आलटून पलटून सत्ता भोगणारे हे प्रस्थापित आजी माजी आमदारांना तालुक्यातील जनतेला साधे पिण्याचे पाणी नियमित देता आले नाही आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी यांना आता आमदारकी पाहिजे आहे यांना आता तरी ओळखा व यांना त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन हर्षदा काकडे यांनी केले.

बोधेगाव येथे विधानसभा तयारीपूर्व आयोजित ‘संकल्प विजयाचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सिनेअभिनेते भाऊसाहेब शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाल्या, या प्रस्थापितांनी २५-२५ वर्ष आलटून पालटून सत्ता भोगल्या व स्वतःचे भले करून घेतले. टक्केवारी शिवाय हे कोणाचे कामही करत नाहीत. टक्केवारीच्या भानगडीत शेवगाव नगरपरिषदेच्या पाणी योजना, एमआयडीसी या मूलभूत प्रश्नावर यांनी खोडा घातला.   

या टक्केखोर प्रस्थापितांना आता जनतेने या निवडणुकीतून हद्दपार करावे. हे सर्व सगेसोयरे वेगवेगळ्या पक्षात तंबू ठोकून बसलेले आहेत. आता गोरगरिबांच्या जीवावर मी लढवणार आहे. आणि मला जर तुम्ही संधी दिली तर पुढील पन्नास वर्षे तुम्ही आमचे नाव घ्याल एवढी विकासकामे मतदारसंघात करून दाखवणार आहे.

सिनेअभिनेते भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गोरगरिबांची लूट या मतदारसंघांमध्ये झालेली दिसते. हर्षदा काकडे या सक्षम महिला नेतृत्व आहे. यांना जर आपण संधी दिली तर तुमचा विकास कोणीही रोखवू शकणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष, जातपात, धर्म न पाहता आपल्या कामाच्या हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवा. यावेळी विनायक देशमुख, हरी फाटे, भाऊसाहेब मडके, विश्वास ढाकणे, भाऊसाहेब सातपुते, जगन्नाथ गावडे, अशोक पातकळ, लक्ष्मण गवळी यांची भाषणे झाली.