स्वच्छ माझे अंगण अभियानात लाडजळगावची उत्तम कामगिरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील लाडजळगाव येथे सन २०२४ मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत “स्वच्छ माझे  अंगण ” या अभियानासाठी लाडजळगाव ग्रामपंचायतीची विविध उपक्रम राबवित प्रथम क्रमांकाच्या दिशेने   वाटचाल सुरु आहे.

घरात होणारा घनकचरा व सांडपाणी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपाय योजना केल्या असून यामध्ये घंटागाडी व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची सुविधा राबविण्यात आली आहे. गावामधे घरात व घराच्या आवारात आपले अंगण स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येत आहेत. यासाठी प्रोत्साहन म्हणून स्वच्छता क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरपंच अंबादास ढाकणे यांच्या हस्ते सुशिला पंकज कराड यांना प्रमाणपत्र  देऊन गौरवण्यात आले.

गावात उल्लेखनीय काम करणाऱ्याचा अशाच पद्धतीने सन्मान केला जातो. गावात सर्वांकडे  वैयक्तिक स्वच्छतागृहे आहेत. तसेच लाडजळगाव पैठण पंढरपूर या पालखी महामार्गाव असल्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी व सार्वजानिक कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थांना उपयोगी पडेल अशा फिरत्या शौचालयाची गाडी घेण्यात आली आहे. यावेळी स्वछता कर्मचारी श्रावण पादर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच शितल विशाल पाटील ग्रा.पं.सदस्य सचिन पाटील, दादासाहेब तहकिक, प्रल्हाद तहकिक आकाश काजळे, कल्याण जाधव, भरत गव्हाणे, वसंत वीर, बबन राठोड, सुरेश घुमरे, शेषराव वंजारी, कदम पाटील, मोहन शिंदे, केदार पाटील, इंदिराबाई कराड, द्रोपदाबाई पादर, नसरीन शेख, डॉ. दत्तात्रेय भदगले, पंकज कराड, भीमराव झरेकर, सोहेल शेख, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत अहिरे उपस्थित होते. 

Leave a Reply