बोधेगाव प्रतिनिधी, दि. ६ : ज्यांना पिठाची गिरणी चालवता येत नाही अशा काही तथाकथित पुढाऱ्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सचिन घायाळला मतदारसंघात आणून या तालुक्यातील शेतकऱ्याची कामधेनू असलेल्या केदारेश्वरला बदनाम करण्याचे काम केले, जोपर्यंत केदारेश्वर नव्हता तोपर्यंत आपला ऊस बांधावर टाकावा लागत होता, याचे त्यांना विस्मरण झाले असून केवळ संस्था अडचणीत आणण्याच्या कुटील कारस्थानाचा त्यांचा डाव आहे.
परंतु ही संस्था सर्वसामान्यांची आहे आणि ती टिकली पाहिजे यासाठी प्रताप ढाकणे यांनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. माधव काटे यांनी केले.
केदारेश्वर कारखान्याच्या २०२४/२५ या गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदिपन आणि मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी कारखान्याचे असि. इंजिनिअर स्वप्निल दौंड त्याच्या पत्नि शितल यांच्या हस्ते बॉयलरची पुजा तर उपाध्यक्ष काटे यांच्या हस्ते अग्निप्रदिपन करण्यात आले.
काटे म्हणाले, स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी संस्थेसाठी वाहून घेत ही संस्था उभी केली आहे यावर ऊसतोडणी कामगार वहातुकदार, उस उत्पादक, मजुर तसेच येणाऱ्या तरुण पिढीचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच ॲड. प्रताप ढाकणे यांनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून उस उत्पादकाचे पैसे दिले.
यावेळी त्रिंबक करोडकर, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार लेखापाल तीर्थराज घुंगरड, संचालक सुरेश होळकर, त्रिंबक चेमटे, बापुराव घोडके, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, ऊस विकास अधिकारी सचिन राऊत, प्रवीण काळोखे, उद्धव दुसूंग, शहाजी जाधव, सुधाकर खोले, उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी प्रास्ताविक केले रमेश गरजे यांनी आभार मानले.