हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी बोधेगावात मार्गदर्शन शिबिर

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ :  इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज व उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबिया या देशातील हज व उमरा या यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंनी हजचे पावित्र्य कायम ठेवावे, यात्रेत ज्या पद्धतीचे आचरण ठेवण्यात येते तसेच आचरण यात्रा संपल्यावर संपूर्ण आयुष्यात ठेवावे. हज व उमरा यात्रेचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन बोधेगाव येथील मदिना माजिदचे मौलाना हाफीज अब्दुल मजीद यांनी केले.

तालुक्यातील बोधेगाव येथे रविवारी (दि.१५) रिअल कमर इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हलसचे संचालक हाजी अब्दूल रहीम यांच्याकडून हज व उमराह या यात्रेला जाणाऱ्या ९ पुरुष व ९ महिला यात्रेकरूसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून त्यांना ऑनलाइन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी हाफीज अब्दुल माजिद हे बोलत होते.

यावेळी बोधेगाव येथील मदिना मस्जिदचे मौलाना हाफिज अब्दुल माजिद, गुलाम हुसेन, प्रा. नवाब पटेल, पत्रकार इसाक शेख, अल्फाज सर, मुफ्ती अकबर, अनिस इंजीनिअर, राजू शेख यांच्यासह विविध भागातून आलेले मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुफ्ती रशिद यांनी आभार मानले.