६ जिवंत गोवंश जनावरांसह ८ मांस विक्रेते घेतले ताब्यात
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव शहरातील आयेशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर व तेथील कुरेशी वस्ती येथे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या ५ पथकाने कारवाई करुन १ लाख ७० हजाराच्या मुद्देमालासह ८ जणांवर कारवाई केली असुन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या धडाकेबाज कारवाईने गोमांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील संजय नगर, आयेशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर, कुरेशी वस्ती तसेच हाजी मेहबूब काॅलनी या परिसरातील तब्बल १२ ठिकाणचे कत्तलखाने व गोमांस विक्रे करणारे दुकाने उध्वस्त करीत जिवंत ६ गोवंश जनावरे त्यांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये, तसेच गोवंश जनावरांची बेकायदा अमानुष कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्या १२ ठिकाणी धाडी टाकुनी अनेकांची धरपकड सुरू केली. हि धडाकेबाज कारवाई शनिवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु होती.
या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून शहरात गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल होत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. त्यानुसार मांस विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरु होती. जुन्या गुन्ह्यातील काहींना समज दिला होता माञ गुप्त माहीतीच्या आधारे पुन्हा मांस विक्री सुरु असल्याचे समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओला व इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पोलीस उप निरीक्षक भूषण हांडोरे, व स्वता पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची स्वतंत्र पाच पथके तयार करण्यात आली. त्यात १३ पोलीस कर्मचारी व २ महीला पोलीस यांनी संपूर्ण परिसरात धाडसञ सुरु केले.
वेगवेगळ्या गल्लीत पोलीसांनी छापे टाकायला सुरुवात केली. बंदूकधारी पोलीसांना पहाताच मांस विक्रेत्यांची एकच पळापळ सुरु झाली. कोणी विक्रीला ठेवले गोमांस लपवून ठेवत होते तर कोणी विक्रीला असलेले गोमांस सोडून खंलकनाल्याकडे पळ काढला तर काहींनी आहे त्या ठिकाणी बसुन पोलीसांच्या ताब्यात गेले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव नगरपालीकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांना घटनेची माहीती दिली तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दहे यांना बोलावून संबंधीत विक्रीला असलेले गोमांस कोणत्या जनावरांचे आहे याची तपासणी करण्यासाठी मांसाचे तुकडे प्रयोगशाळेत पाठविले.
नगरपालीकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण त्यांच्या सोबत पालीकेचे दोन सुपरवायझर व ६ सफाई कामगार यांनी पोलीसांनी पकडलेले गोमांस भरण्यासाठी दोन ट्रॅक्टर लावले. एका ट्रॅक्टर मध्ये गोमांस, गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन राहीलेले कातडे व इतर टाकाऊ मांस ताब्यात घेवून पोलीसांच्या साक्षिने त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली.
बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही. कायद्याने बंदी असणाऱ्या कोणत्याही जनावरांची मांस विक्री करणारा आढळला तर त्यावर कारवाई केली जाणार – पोलीस निरीक्षक भगवान मथुरे
दरम्यान कोपरगाव पोलीसांनी प्रथमच एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. काहींनी तर थेट राहत्या घरात जनावरांची कत्तल करण्याची व्यवस्था केली आहे. तिनं ठिकाणचे कत्तलखाने पोलीस, पालीका प्रशासनाने उध्वस्त केले तर नगरपालीकेने मांस विक्रीसाठी तयार केलेल्या पञ्याच्या २२ गाळ्यापैकी अनेक गाळ्यामध्ये बेसुमार गोवंश जातीचे मांस विक्री सुरू होती. अखेर विक्रीसाठी ठेवलेले सर्व मांस ताब्यात घेतले.
वारंवार कायदेशीर सुचेना देवूनही जर पुन्हा पुन्हा तोच गुन्हा होत असेल आणि नागरी वस्तीत बेसुमार कत्तल होत असेल तर पालीका प्रशासन यापुढे कत्तलखान्यावर जेसीबी फिरवण्याची धडक कारवाई करण्याची व्यवस्था करणार आहे. – पालीका आरोग्य निरीक्षक सुनिल आरण
यावेळी काही विक्रेत्यांनी व कत्तल करणाऱ्यांनी पोलीसांपासुन बचाव करण्याचा प्रयत्न केला. काहींनी आपली स्टाईल वापरण्याचं धाडस करत होते. माञ पोलीसांपुढे कोणाचे काहीच चालले नाही. त्यामुळे नेहमी थातुरमातुर होणाऱ्या कारवाई तून पुन्हा जैसे थे गोवंश कत्तल करणाऱ्यांना यावेळी पोलीसांनी चांगलाच घाम फोडत घरोघरी आणि गल्लोगल्ली कारवाईचा सपाटा लावल्याने अनेक मांस विक्रेते पुन्हा उघड झाले. पोलीसांच्या या कारवाईचे सर्वञ कौतूक होतं आहे.