शेवगाव प्रतिनिध, दि. ११ : शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये महिलांच्या कष्टाला पर्याय नाही, याची जाणीव ठेवून कृषी विभाग शेवगाव यांनी मौजे वरूर बुद्रुक येथे सन २०२४ – २५ मधील रब्बी हंगामात हरभरा पिकाची महिलांची विशेष शेतीशाळा आयोजित केली होती.

तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ आणि कृषी पर्यवेक्षक प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरुर गावच्या कृषी सहाय्यक सुवर्णा मुरदारे यांच्या नियोजनाखाली ही शेतीशाळा राबवण्यात आली. रेखा दिनकर म्हस्के यांच्या शेतात प्रक्षेत्र भेट व शेतीशाळेचा शेतीदिन कार्यक्रम आज बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात शेतीशाळेची प्रतिज्ञा घेऊन झाली. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कृषी अधिकारी वैष्णवी घुले उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती घुले यांनी महिलांना हरभरा पिकाचे काढणीपश्चात तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती शितल आगळे आणि श्रीमंती शैलजा तागड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी महिलांना माहिती दिली.

त्यानंतर प्रक्षेत्र भेट करण्यात आली. प्रक्षेत्र भेटीमध्ये मुरदारे यांनी महिलांना “पक्षी थांबे ” याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटी करिष्मा शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले
