कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अचानक रस्त्यावर उतरून तब्बल ६३ वाहन चालकाकडून ३० हजार पेक्षा अधिक रुपयांचा दंड वसुल केल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले कि, शहरात बहुतांश लहान मुलं गाड्या चालवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालवतात. काही लोक चोरीच्या गाड्या घेवून जातात, अनेकांना वाहन परवाना नाही. गाडीचा फॅशनेबल नंबर, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसविण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या फौजफाट्यासह शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नगर मनमाड महामार्गावर वाहतूक करणाऱ्यांची चौकशी केली असता ६३ वाहनधारकांवर कारवाई केली.

त्यात ऑनलाईन २९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला तर १६ वाहने ताब्यात घेवून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले त्यांच्यावर अधिक दंडात्मक कारवाई करून दंड वसुल केला जाणार आहे. नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा हि मोहीम कायम राबवली जाणार आहे असेही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले.
