खडकीच्या माजी नागसेविका ताराबाई जपे यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : प्रभाग क्रं १ खडकी येथील माजी नागसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे यांचे दि. २६/०५/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. खडकी परिसरात तारा मावशी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने खडकी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या साध्या सरळ स्वभावामुळे त्या घराघरात पोहचल्या होत्या त्याचीच पावती म्हणून अनेक महिला व नागरिकांना माहिती मिळताच अंत्यविधीसाठी गर्दी केली होती.

त्यांच्या वर दुःखद अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, नितीनदादा कोल्हे, आमदार आशुतोष काळे, यांचेसह कार्यकर्ते यांनी शोक व्यक्त केला. ताराबाई गणपत जपे यांच्या पश्चात दिपक जपे, मारुती जपे, पाटील जपे हे तीन मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.