कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव उद्धव ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख प्रफुल्ल सोमनाथ शिंगाडे (३८) यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर कोपरगाव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

प्रफुल्ल शिंगाडे यांच्या रूपाने शिवसेना चळवळीतला एक कट्टर कार्यकर्ता हरपला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
