शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : गेल्या काही वर्षात श्री क्षेत्र माहूरच्या धर्तीवर भगवती देवी व अष्ट दिपमाळांचे मंदिरांची उभारणी, सर्व पुजाविधीही तेथील धार्मीक रूढीनुसारच संपन्न होणाऱ्या श्रीक्षेत्र अमरापुर श्रद्धाभावाचे आयडॉल ठरले आहे. रेणुकामाता परीवारामुळे येथे अध्यात्मासह अर्थसेवेचा समांतर वारसा देखील प्रवाही आहे, असे गौरवोद्गार राम महाराज झिंजुर्के यांनी काढले.
सोमवारी नवरात्री उत्सवाची सांगता, शतचंडी यागविधी व पुर्णाहुतीने विधीवत मंत्रोच्चारात झाली. त्यावेळी आयोजीत काल्याचे कीर्तनात निरुपण करताना ते बोलत होते.
रेणुका भक्तानुरागी ज्येष्ठ अर्थ तज्ञ तथा रेणुकामाता मल्टी स्टेटचे प्रवर्तक डॉ. प्रशांत नाना भालेराव, तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हनुमान देवस्थानचे महंत रमेशआप्पा महाराज, अशोक महाराज उदागे, कृष्णा महाराज मुळीक पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, दामुअण्णा काकडे, जनार्दन लांडे पाटील, श्रीमंत घुले, रामदास गोल्हार, जनाबाई घोडके, सरपंच विजय पोटफोडे, बाळासाहेब चौधरी, डॉ. अरविंद पोटफोडे, आदी प्रमुख उपस्थीत होते.
कायीक, वाचीक व मानसीक असे सेवाव्रताचे प्रकार सर्वश्रुत आहेत. नवरात्री उत्सवांत या तीनही सेवांचा संगम पहावयांस मिळतो. त्यामुळे हा उत्सव साधनेसह सामर्थ्य प्राप्तीचाही मानला गेला आहे. असे स्पस्ट करून झिंजुर्के महाराज पुढे म्हणाले, आरक्षणासह महीला गौरवाचे परंपरेला पौराणीक आधार आहे. नवरात्री उत्सव संयमीत जीवनाचा सार प्रवाही करते. प्रतिगामी पौराणीक घटनांचे अनुकरण करीत रेणुकामाता परीवाराने आदीशक्तीचा घातलेला नवरात्री जागर स्पर्धेच्या युगाला दिशा देणारा आहे.
यावेळी आदिशक्तीचे स्वरूप मानुन एकवीस कुमारीकांना अंगवस्र, श्रीफळ, दक्षिणा देऊन पाद्य पुजा करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
तुषारदेवा वैद्य, कार्तिक मुनगुंटीवार, सच्चिदानंद देवा, राजेंद्र नागरे, अश्वलींग जगनाडे, संजय कर्डीले, राहूल वाघमारे, आदींसह भाविक मोठया संख्येने उपस्थीत होते.