आत्मामालिकचा पार्थ गोरे सीईटी मध्ये ९९.५४% गुणमिळवून विद्यालयात प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. पार्थ सोमनाथ गोरे यांस ९९.५४ % गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, चि. गोडसे तन्मय श्रीराम ९८.९४% द्वितीय, टोरपे अथर्व सुनील ९७.९२% तृतीय, आमरे प्रांजल संजय ९७.६४% चतुर्थ पवार प्रणव सिताराम ९६.३१% मिळवून  पाचवा क्रमांक पटकाविला आहे.  तसेच २० विद्यार्थ्यांनी  ९०% पेक्षा  अधिक गुण प्राप्त केलेले आहे.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाच्या दृष्टीने शिक्षणाबरोबर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती व प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करून घेतली जाते. आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट व आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने नीट, जेईई व सीईटी प्रवेश पात्रता परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येते. यामुळेच गेल्या ६ वर्षात ३५ विद्यार्थ्यांची नीट परीक्षेच्या माध्यमातून एम.बी.बी.एस. साठी निवड झाली आहे. तर ०९ विद्यार्थ्यांची आय.आय.टी. व एन.आय.टी. मध्ये निवड झाली असे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यानी  सांगितले.

            अभ्यासाचे सुक्ष्म नियोजन तसेच वर्ग, वसतिगृह, अभ्यासिका, भोजन या सर्व सुविधा एकाच छत्राखाली असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेता येते. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करणे आणखी सोपे व्हावे यासाठी आत्मा मालिकच्या वतीने शैक्षणिक टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशी माहिती शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी दिली.

            या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे  आश्रमाचे  संत मांदिआळी, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोष्याध्यक्ष विठ्ठलराव होन, सर्व विश्वस्त मंडळ तसेच वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,  प्राचार्य नामदेव डांगे  व प्रविण उगले,  विष्णुवर्धन महांकाळी, संग्राम गोपाळे सह सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.

Leave a Reply