ट्रॅक्टर – रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू, तीन जखमी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात हॉटेल संस्कृती समोर शुक्रवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने उभ्या असलेले ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाहतूक काही काळ बाधित झाली होती. 

या अपघातात रिक्षा चालक वाल्मीक नाना घनघाव (६०) रा. पिंपळस तालुका निफाड हे मयत झाले असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे, तर सलीम रज्जाक सय्यद (३२) रा. येसगाव हे व इतर दोन जण गंभीर जखमी  झाले आहेत त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ढिकले यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. एन. एस.वलवे हे करीत आहेत.

Leave a Reply