कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील डाऊच बुद्रुक शिवारात उंबरी नाल्याच्या काटवणात एका चाळीस ते पन्नास वर्षे अनोळखी महिलेचा खून करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

सदर महिलेतचा खून कोणी व का केला याचा तपास पोलीस करत आहे. चर्चेला उधाण आले आहे. अज्ञात इसमा विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या पूर्वी घडली आहे.

याबाबत पोलीस पाटील मीराबाई रोकडे (रा.चांदेकसारे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर काटवणामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत टाकला असल्याचे त्यात म्हंटले आहे. श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर महिलेचा अज्ञात इसमाने खून का केला नेमके त्याचे कारण काय व कोणी नेमका कुठला याचा तपास पोलीस घेत आहे. मात्र अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
