मराठी पत्रकार परिषदेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी कदम, कार्याध्यक्षपदी भवर, उपाध्यक्षपदी नाईक, आभाळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उत्तरनगर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके यांनी दिली.

   यामध्ये तालुकाध्यक्षपदी अरुण कदम, उपाध्यक्ष महेश नाईक, प्रवीण आभाळे, कार्याध्यक्ष संजय भवर, संघटक गणपत देवकर, मार्गदर्शक साहेबराव दवंगे, शिवाजी गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख भागिनाथ गायकवाड, अमोल गायकवाड, ऋषिकेश कासार, खजिनदार गणेश देवकर, सचिव ज्ञानदेव भुसे, सहसचिव सागर पवार, कार्यकारिणी सदस्य विष्णुपंत सुंबे, राहुल आभाळे, संजय साबळे, गणेश दाणे, सुमित दरेकर, गोरक्षनाथ वर्पे, मधुसूदन ओझा, संगीताताई मालकर, श्रीकांत नरोडे, अमिन शेख यांचा नूतन कार्यकारणीमध्ये समावेश आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली व सरचिटणीस रोहित टेके यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे ओंकार फोटो स्टुडिओ येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,

कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके, मावळते तालुकाध्यक्ष गणेश दाणे यांनी शुभेच्छा दिल्या.