कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या कोपरगाव आगाराच्या निवडणुकीत पांडुरंग गरकल यांची अध्यक्षपदी तर आप्पासाहेब पानगव्हाणे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

कोपरगाव आगारासाठी मागील काही काळात महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत. स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहराला नवीन बसस्थानक मिळाले असून त्याचा थेट फायदा प्रवासी व कामगार वर्गाला होत आहे. तसेच कोल्हे परिवाराने नेहमीच एस.टी. कामगारांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेतले आहेत.

अलीकडेच नवीन बसेस कोपरगाव आगाराला उपलब्ध करून देण्यासाठी स्नेहलताताई व विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रभावी पाठपुरावा केला. यामुळे वाहक व चालकांना दिलासा मिळून वाहतूक सेवा अधिक सुरळीत होत आहे.एस टी अधिकारी कर्मचारी यांना विश्रामासाठी दहा कॉट संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामुळे कोल्हे यांचे या कर्मचारी संघटनेच्या हितासाठी सातत्याने काम सुरू असते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या प्रश्नांबाबत शासनदरबारी ठोस मांडणी करून तोडगा काढावा, यासाठी कोल्हे परिवार सदैव खांद्याला खांदा लावून सोबत उभा राहील, असे आश्वासनही या वेळी कोल्हे यांनी दिले.कामगार संघटना ही प्रत्येक एस.टी. कामगाराची ताकद आहे. त्यांच्या न्याय्य मागण्या, सुविधांचे संवर्धन व समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. गरकल व पानगव्हाणे यांची बिनविरोध निवड ही संघटनेतील एकोपा आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास यावेळी कोल्हे यांनी व्यक्त केला.

या निवडीवेळी माजी राज्य उपाध्यक्ष एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य संजीव गाडे, माजी आगार अध्यक्ष सचिन घुमरे, माजी आगार कार्याध्यक्ष प्रवीण आहिरे, विनोद रोहोम, दत्ता संवत्सरकर, संतोष जाधव, रामहरी गव्हाणे, प्रशांत जाधव, वाल्मीक पवार, सचिन गांगुर्डे, संदेश बाविस्कर हे उपस्थित होते.
