कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : संजीवनी अकॅडमी ही एक नावलौकिक प्राप्त संस्था आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही कटीबध्द आहोत. शैक्षणिक अभ्यासक्रम, खेळ, सर्जनशिलता व जागतिक प्रदर्शन यांच्या माध्यमातुन सर्वगुण संपन्न व जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणारे विद्यार्थी घडविणे हा आमचा ध्यास आहे.

याचाच एक भाग म्हणुन नुकत्याच ग्वाल्हेर येथे झालेल्या अमिटी युनिव्हर्सिटी आयोजीत नॅशनल एमयुएन या राष्ट्रीय रूपर्धेत संजीवनी अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य अशा सहा पदकांची कमाई केली तर तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन प्रमाणपत्र मिळविले. हे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे, असे उदगार संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी काढले.

ग्वाल्हेर येथे अलिकडेच अमिटी युनिव्हर्सिटी आयोजीत ‘एमयुएन’ ही राष्ट्रीय स्पर्धा झाली. यात देशातील ५४७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली तर तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन प्रमाणपत्र मिळविली. या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभात डॉ. कोल्हे बोलत होत्या.यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव, मार्गदर्शक शिक्षक विलास भागडे व विद्या आरोरा उपस्थित होते.

या स्पर्धेतील ‘महाभारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत प्रियांशु प्रवीण हिरे हीने अर्जुन हे पात्र सादर करून ऑनरेबल मेंशन वर्गवारीत सुवर्ण पदक मिळविले. जान्हवी अनुप पटेल हीने युधिष्ठर हे पात्र साकारून ऑनरेबल मेंशन वर्गवारीत रौप्य पदक मिळविले. स्वरा कैलास आढाव हीने दुर्याेधन पात्र सादर करून व्हर्बल मेंशन वर्गवारीत रौप्य पदक मिळविले. युग शारव देसाई याने भीष्म हे पात्र सादर करून बेस्ट ड्रेस वर्गवारीत सुवर्ण पदक प्राप्त केले.

तसेच याच राष्ट्रीय स्पर्धेतील ‘युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्ली’ या संकल्पनेवर आधारीत अन्वी हरीश डुबे हीने नॉर्थ कोरीया देशाचे प्रतिनिधित्व करून व्हर्बल मेंशन या वर्गवारीत रौप्य पदक पटकाविले तर इशिका विनेाद मालकर हीने बेल्जियम देशाचे प्रतिनिधित्व करून बेस्ट ड्रेस वर्गवारीत सुवर्ण पदक मिळविले.

कोमल श्याम उपाध्ये, शुभ निखिल समदडिया, पलक सतिश पटेल, मधुरा राहुल गांगुर्डे, शांभवी विशाल मुंडलिक, आरोही अमोल कुलकर्णी, आदिती नितिन जोरी, नक्षत्र प्रदिप मांडवडे , श्रध्दा गोकुळ भागवत, जान्हवी रामेश्वर चिंतामणी, सई धनंजय कुंभार, राजवी रश्मी शर्मा व संस्कृती अतुल इनामके यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवुन प्रमाणपत्र मिळविले.

या स्पर्धेत दिल्ली पब्लीक स्कूल, डीएव्ही स्कूल्स, केंद्रीय विद्यालय, बिरला इंटरनॅशनल स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, आकाश इन्स्टिट्युट, आयलंड इन्स्टिट्युट, पारूल युनिव्हर्सिटी वडोदरा, बुंदेलखंड झांसी, हैद्राबाद डिफेन्स अकॅडमी, दिल्ली युनिव्हर्सिटी, अमिटी युनिव्हर्सिटी, आयकॉन ग्नोबल स्कूल, इंदौरइन्स्टिट्युट ऑफ लॉ अशा अनेक संस्थांचे ५४७ प्रतिनिधी आले होते. यातही आत्मविश्वास, बुध्दिमत्ता आणि जागतिक दृष्टिकोनाच्या जोरावर संजीवनीच्या गुणवंतांनी बाजी मारली. या राष्ट्रीय यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
