गवळी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव गवळी तर उपाध्यक्षपदी सत्यभामा आभाळे

कोपरगांव प्रतिनिधी, दि.९ :  तालुक्यातील मढी खुर्द येथील श्रीपतराव गवळी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव नाना गवळी तर उपाध्यक्षपदी श्रीमती सत्यभामा बाबुराव आभाळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यांत आली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

या निवडीबददल नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव गवळी व उपाध्यक्ष श्रीमती सत्यभामा आभाळे यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने विवेक कोल्हे यांनी सत्कार केला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश आभाळे यांनी प्रास्तविक केले. यावेळी मावळते अध्यक्ष बबनराव गवळी तर उपाध्यक्ष गोपिनाथ आभाळे यांचाही सत्कार करण्यांत आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव गवळी बोलतांना म्हणाले की, ग्रामिण अर्थकारण फुलविण्यांत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मोठे योगदान दिले असुन गांवपातळीवर सहकारी सोसायट्यांना सातत्याने सहकार्य केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय, निमशासकीय योजनांची अंमलबजावणी करून सभासद शेतक-यांच्या उत्कर्षात मदत करू. या निवडीप्रसंगी कोपरगांव तालुका सह निबंधक एस.पी. रूद्राक्ष यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.