कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : दक्षिण भारत विभागीय सीबीएसई क्रिकेट संघ निवड चाचणी स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या समर रघूबीर सैनी याची चौदा वर्षे वयोगटात राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. राहाता येथे संपन्न झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेत तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला.

दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण भारत संघातील १८ खेळाडूत सैनीचा समावेश नक्की झाला. या निवड चाचणी स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या अन्य तिन खेळाडूंनी दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कुल्सच्या संचालिका डाॅ.मनाली कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाल्या, या निवड चाचणी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात संजीवनी अकॅडमीच्या आयुश अमोल आबक याने रौप्यपदक आणि अथंग दिपक मुसमाडे याने कास्य पदकाची कमाई केली. १७ वर्षे वयोगटात आयुश परेश उदावंत याने रौप्यपदकाची कमाई केली. या तीघांचा दक्षिण भारत निवड चाचणी स्पर्धेत पहिल्या ४८ खेळाडूंत समावेश झाला.

महाराष्ट्र , गोवा व कर्नाटक राज्यातील सीबीएसई स्कूल मधिल खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश होता. या खेळाडूंचे संजीवनीचे ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले. तसेच समर सैनीला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर ऑफ ऑडिट सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्य शैला झुंझारराव, क्रिडा प्रशिक्षक कृष्णा सुरासे आदि उपस्थित होते.

संजीवनी अकॅडमीच्या समीर सैनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड संस्थेच्या दृष्टीने भुषणावह आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध खेळांना प्राधान्य दिले जाते. खेळामुळे विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडते. खेळातील यश अपयश पचवुन ते नव्या उर्जेने वाटचाल करतात. अभ्यासातील गुणवत्तेबरोबरच खेळातील नैपूण्य आणि कौशल्य विकसित करण्यावर संजीवनी अकॅडमीचा भर असतो. – डाॅ. मनाली कोल्हे (संचालिका )
