ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : ‌राज्यासह अहिल्यानगर  जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, माञ कोपरगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासुन सुर्यदर्शन व्यवस्थित होत नाही. आठ दिवसांपासून दररोज ढगाळ वातावरण दिसते तुफान पाऊस पडेल असे वाटते माञ प्रत्यक्षात कुठेतरी पावसाचे चार सरी पडून शिडकावा होतो.

आठ दिवसांपासून मुबलक सुर्य प्रकाश नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुर्य प्रकाशा अभावी शेतातली उभी पिके रोगराईने बाधीत  होवून मोठे नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी   सोलसर पंप  सुर्य प्रकाशा अभावी  चालु शकत नाहीत.

शहरातील अनेक घरावरती  सोलर बसवलेले आहेत पण सुर्य प्रकाश नसल्याने त्यांची विजनिर्मीती होतं नाही. सततच्या ढगाळ वातावरणामुळे व वातावरणातील बदलामुळे  आजाराचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील अंधारलेल्या वातावरणाचा शेतीसह जनावरांवर आणि माणसांवर होत आहे. ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम व सुर्य प्रकाश नसल्याने कोपरगाव तालुक्यातील  वातावरण दुषित होत.

 एखादा मोठा पाऊस आल्यानंतर परिसर, ओढे नाले तुडुंब  भरुन प्रवाहीत होता माञ येथे बारीक रिमझिम सरींमुळे चिखल व दलदल झाली आहे. एकाच वेळी नागरीकांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ निसर्गाने आणली आहे.

Leave a Reply