कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रवींद्र गिरजा भालेराव यांची शिवसेनेच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाउपप्रमुख पदी निवड करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष वाढीसाठी विशेष काम करत शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन केले. याच कामाची दखल घेत त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर स्व आंनंद दिघे यांची शिकवणीचा सक्रिय प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे रविंद्र भालेराव यांनी सांगितले.

निवडीचे पत्र त्यांना मिळाले आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ राजू वाघमारे व अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे

यांच्या सहीचे पत्र त्यांना मिळाले आहे.यांच्या निवडीचे कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करत त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व अशोकराव नवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, प्रमोद भालेराव, रवींद्र औताडे, रियाज शेख आदी उपस्थित होते.
