७ मार्च पासुन लायन्स बिझनेस एक्स्पोला सुरवात

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देणारा लायन्स बिझनेस एक्स्पोला दि. ७ मार्च पासुन सुरवात होत असुन नागरीकांनी या एक्स्पोचा आनंद घ्यावा असे अवाहन एक्स्पो समितीचे राजेश ठोळे व राहुल नाईक यांनी पत्रकारपरीषदेत दिली.

Mypage

यावेळी व्यासपिठावर कर्मविर काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, लायन्स क्लबचे सत्येन मुंदडा, राम थोरे, सुरेश शिंदे, शैलेश बनसोडे, वर्षा झंवर, लायन्स क्लब अध्यक्ष सुमित भट्टड, लिओ क्लब अध्यक्ष पृथ्वी शिंदे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा रोशनी भट्टड यांचेसह लायन्स क्लब, लिओ क्लब, लिनेस क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांच्या उपस्थित निमंत्रण पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.

Mypage

राजेश ठोळे पुढे म्हणाले की, ११ वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. आता १२ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. नारीकांच्या उत्स्फुर्त प्रतिसदामुळेच आम्ही ११ वर्षांचा टप्पा पुर्ण केला आहे. असाच प्रतिसाद येथुन पुढे देवुन कार्यक्रमाची शोभा वाढावावी.

Mypage

दरवर्षी एक्स्पोच्या माध्यमातुन नागरीकांना काहीतरी नविन देण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्याप्रमाणे यावर्षी ७ ते ११मार्च २०२४ या कालावधीत ‘शिवदर्शन थीम’च्या माध्यमातुन देशातील बरा ज्योर्तिलिंगाचे दर्शन कोपरगावमध्ये बसून घेण्याचा योग लायन्स क्लबने घडवुन आणला आहे.
महिलांना प्रोहत्सान देण्यासाठी महिलांना यावर्षी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे महिला व मुलींना कोणत्याही शुल्काची किंवा पासची गरज भासणार नाही.

Mypage

या एक्स्पोमध्ये एकुण 210 स्टॉल अुसन प्रथमच बंधकाम व्यावसायिक यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. यामध्ये बांधकामांशी निगडित वस्तुंचा समावेश असणार आहे. अशी माहिती राजेश ठोळे यांनी दिली. ७ मार्च  ते ११ मार्च २०२४ या कालावधी नारीकांना विविध कार्यक्रमाची रेलचेल अनुभवयाला मिळणार आहे. यामध्ये महिला रॅली, चित्रकला स्पर्धा, रक्तदान, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मधुराज रेसीपी यांचा कुकींग शो, अंताक्षरी, होम मिनिस्टर यासह विविध कार्यक्रमाचे समावेश आसणार आहे. अशी माहिती राम थोरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश बनसोडे यांनी केले तर आभार सत्येन मुंदडा यांनी मानले.

Mypage