शेवगाव प्रतिनिधी, दि. ४: कर्जाच्या परत फेडीसाठी दिलेला धनादेश वटला नाही त्यामुळे न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात कर्जदार रियाज अन्वर शेख रा. इंदिरानगर शेवगाव यास चार महिने सक्त मजूरी आणि ४६ हजार दडाची शिक्षा न्यायाधिश एच. आर. जाधव यांनी ठोठावली आहे.
रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटीकडून शेख याने कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परत फेडीसाठी त्यांनी २१ हजार ११० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही ‘ संस्थेच्या वतीने अभिजित जयवंत यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता.
संस्थेच्या वतीने धीरज आव्हाड यांची साक्ष महत्व पूर्ण ठरली. कर्ज घेतल्याचे कागदोपत्री पुरावे व साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने शेख यास दोषी धरले. धनादेश वटला नाही म्हणून ४ महिने सक्त मजूरी आणि ४६ हजार रु. दंड, दंड भरला नाही तर एक महिना आणखी सक्त मजूरीची शिक्षा ठोठावल्याचा निकाल दिला. ॲड. टी.एस. उदास यांनी रेणुका माता मल्टीस्टेटच्यावतीने काम पाहिले.