मोदी शासनाला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वनभोजन व कार्यकर्ता संवाद मेळावा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कार्यकाळात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी मानून देशाचा विकास केला आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मानकरी ठरला आहे. शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय कुटुंब आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी २०२४ ला आपल्याला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवे असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी म्हटले आहे.

         मोदी शासनाला ९ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त मोदी @9 अंतर्गत टिफिन बैठक व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन माझी वसुंधरा अभियानात राज्यात सलग दुसर्‍या वर्षी दीड कोटी रुपयाच्या प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या वाघोली येथे रविवारी (दि २५ ) करण्यात आले होते, यावेळी आ.राजळे बोलत होत्या. यावेळी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,  कार्यकर्ते यांनी स्वतःची शिदोरी घेऊन उपस्थित राहून वनभोजनाचा आनंद घेतला, यावेळी मोदी शासनाच्या कार्यकाळात केलेले विकास कार्य सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.

           भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माणिक खेडकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, अशोकराव चोरमले, बापू पाटेकर, भीमराज सागडे, कचरू चोथे, जे बी वांढेकर, नारायणराव पालवे,  माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड, डॉ मृत्युंजय गर्जे,  नंदकुमार शेळके,  बजरंग घोडके, सुनील ओहोळ, बाळासाहेब आव्हाड शिवाजीराव भिसे, चारूदत्त वाघ,  नामदेव लबडे,  रोहिणी फलके, मंगल कोकाटे  उपस्थित होत्या.

यावेळी आमदार राजळे यांनी वाघोली गावाला माझी वसुंधरा योजनेअंतर्गत दुसऱ्यांदा राज्य पातळीचं पारितोषिक मिळालं याबद्दल सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचा सन्मान केला. त्या पुढे  म्हणाल्या, शाश्वत जलस्रोत निर्मिती करिता वाघोली गावात भारत फोर्स तसेच वाघोली व वडुले ग्रामस्थांच्या लोकसहभागातून नदी खोलीकरणाचे अभुतपुर्व कार्य झाले आहे, याचा लाभ निरंतर कालावधी करिता वडुले – वाघोली या गावाबरोबरच परिसरातील गावाला नक्की होईल. त्याचबरोबर येथील वृक्षरोपण, बायोगॅस, शाळा सुशोभीकरण आदी कार्य आदर्शवत आहेत.

        यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, कवी आत्माराम शेवाळे यांनी आ.  राजळे यांच्यावर केलेल्या कवितेचे वाचन करण्यात आले तसेच अश्विनी तुतारे या विद्यार्थिनीने आमदारांचे काढलेले अप्रतिम असे रेखाचित्र देऊन त्यांचा सन्मान केला.          उपस्थितांनी यावेळी वडुले बु.- वाघोली गावात वृद्धा नदीवर सुरु असलेल्या नदी खोलीकरणाचे कामाची तसेच गावातील बायोगॅस, वृक्षरोपण, ग्रामपंचायतने गावांतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र जमधडे केले तर सुरेश आव्हाड यांनी आभार मानले.