कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३ : बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्रासमोर निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काळानुरूप अत्याधुनिक बदल करत साखर कारखानदारीत नाविन्यपुर्ण प्रयोगातुन यश साधले त्यामुळे संजीवनीची ओळख देशात निर्माण झाली आणि येथील तंत्रज्ञान देशाच्या साखर उद्योगात देण्याचे महत्वपुर्ण काम केले असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. स्पेंटवॉश पासुन बायोगॅस आणि त्यातील सल्फर बाजुला करणे तर थेट ऊसाच्या रसापासुन इथेनॉल निर्माती सर्वप्रथम संजीवनीने केली असेही ते म्हणांले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर अध्यक्ष विवेक कोल्हे, संचालक विश्वासराव महाले, चित्राताई महाले या उभयतांच्या हस्ते करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यांत आले.

प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्तविकात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली येत्या हंगामात ७ लाख ५० हजार मे. टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यांत आले असुन त्यानुसार आवश्यक तेथे आधुनिकीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे ते म्हणांले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ संचालक त्र्यंबकराव सरोदे यांच्या हस्ते विश्वासराव महाले, सौ. चित्राताई यांचा तर संचालक बाळासाहेब वक्ते यांचा वाढदिवसानिमीत्त अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, साखर कारखानदारीत जे जे पायलट प्रकल्प आहेत त्याची यशस्वी उभारणी संजीवनीत झाली त्यातुनच देशात येथील तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. नॅशनल शुगर इन्स्टीटयुट, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, कानपुर, कोईमतूर, पाडेगांव संशोधनात काम करणा-या अभ्यासु व्यक्तींनी संजीवनीस भेटी देवुन येथील परिस्थितीसह पायलट प्रकल्पांचा अभ्यास केला. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारातील धोके सर्वप्रथम ओळखून त्यावर उपाययोजना सुचविल्या त्यांचा आपणा सर्वांनाअभिमान आहे.

चालु हंगामापासून संजीवनीचे युनीट दोन म्हणून रानवड सहकारी साखर कारखाना चालविण्यांत घेतला आहे. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळातील गॅट करार आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत उपक्रम या दोन्ही संधीत संजीवनी साखर कारखानदारीसह वेगवेगळ्या उपपदार्थ निर्मीतीत देशात डौलाने उभा आहे.

वाहनांना लागणारे इंधन बायो सीएनजी, खताच्या मात्रेत आवश्यक असणारे पोटॅश येथेच विकसीत केले असुन त्याचे लोकार्पण ५ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे ही बाब ऐतिहासिक सुवर्णक्षरांने नोंद घेण्यासारखी आहे. शेतक-यांच्या गरजा ओळखून ते थेट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यांचे काम देशात सर्वप्रथम संजीवनीने केले आहे. शेतीपुरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन, मोत्याची शेती, बांबुची शेती, पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्प यातुन संजीवनीची वेगळी ओळख निर्माण करण्यांत युवा अध्यक्ष विवेक कोल्हे व सर्व उस उत्पादक सभासद, संचालक मंडळ करत आहे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमांस माजी सभापती शिवाजीराव वक्ते, संचालक आप्पासाहेब दवंगे, त्र्यंबकराव सरोदे, ज्ञानेश्वर होन, संजय होन, शिवाजीराव बाराहाते, त्र्यंबकराव परजणे, बाळासाहेब शेटे, डॉ. गुलाबराव वरकड, संदिप चव्हाण, मोहनराव वाबळे, विलासराव वाबळे, रमेश आभाळे, केशव भवर, बापूसाहेब औताडे, बाळासाहेब वक्ते, कैलास माळी, अशोक भाकरे, कामगार नेते मनोहर शिंदे, विविध संस्थांचे प्रमुख, आजी माजी संचालक, प्रकाश डुंबरे, संजीव पवार, विशाल वाजपेयी, एस. सी. चिने, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, पदाधिकारी आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले तर आभार संचालक रमेश घोडेराव यांनी मानले.

सहकारातुन सर्वांगीण प्रगती या तत्वांने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अद्यावत संशोधन केंद्र असुन आगामी काळात २५ उपपदार्थांचे काम त्याच बरोबर ३० टनी बॉयलरचे ५० टनी क्षमतेत आधुनिकीकरण येथे सुरू आहे. संजीवनीने मतदारसंघासह कार्यक्षेत्रात २०० छोटे मोठे बंधारे बांधुन त्यातुन शेतक-यांना शाश्वत पाणी मिळवुन देत आहे. गावागावातील स्मशानभुमीचेही सपाटीकरण संजीवनीनेच केल्याचे सुतोवाच बिपिनदादा कोल्हे यांनी यावेळी बोलतांना केले.
