कोपरगाव पालीकेत १५ महीलांना नगरसेवकांची संधी

आरक्षणामुळे अनेक प्रभाग बदलले

प्रतिनिधी  प्रतिनिधी दि. ८ :  कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकताच झाला असुन त्यात ३० पैकी १५ महीलांना आरक्षणामुळे संधी मिळाल्याने अनेक दिग्गजाचे पत्ते कट झाले आहेत तर काहींची संधी सर्व बाजुंनी हुकली आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंके, मुख्याधिकारी सुहास जगताप व पालीकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने प्रभाग आरक्षणाची सोडत  १५ प्रभागातील ३० नगरसेवक निवडीसाठी महीला आरक्षण सोडत चिठ्ठी द्वारे काढ्यात आली. कोपरगाव नगरपालीका शाळा क्रमांक ३ मधील कु. निकीता सुनिल वाहुळकर, इयत्ता ४ थी, कु. श्रावणी रविंद्र कदम, इयत्ता ४ थी व कु.  प्राची अनिल सोळसे, इयत्ता ५वी या विद्यार्थ्यांनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. 

सर्वप्रथम अनुसूचित जाती महीला आरक्षण काढण्यात आले त्यात पाच जागा पैकी तीन महीला आरक्षण निश्चित करण्यात होते. पाच चिठ्ठ्यातून तीन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी एकुण ९ प्रभाग होते पैकी आठ प्रभाग चिठ्ठ्या काढून या वर्गासाठी आरक्षित केले, त्यात ४ चिठ्ठ्या महीला आरक्षणासाठी काढण्यात आल्या. प्रभाग क्रमांक पाच मधील अ  हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला तर उर्वरीत प्रभागातील  सर्वसाधारण प्रभागातील महीलांचे संख्येच्या ५० तुलनेत चिठ्ठी द्वारे आरक्षण जाहीर करण्यात आले. 

 कोपरगाव नगरपालीकेचे  निवडणुकीचे आरक्षण हे सन २०११ च्या जनगणनेनुसार झालेल्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचे प्रभाग निश्चित केल्याची माहीती उपजिल्हाधिकारी सायली सोळंके व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.

 नव्याने प्रभाग निहाय सोडती द्वारे पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. १- अ) सर्वसाधारण महीला. ब) सर्वसाधारण,  प्रभाग क्र २- अ) अनुसूचित जाती,  ब) सर्वसाधारण महीला, प्रभाग क्र.  ३ – अ ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला, ब)  सर्वसाधारण, प्रभाग ४ – अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला , ब) सर्वसाधारण.  

प्रभाग ५- अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण महीला, प्रभाग ६- अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला, ब) सर्वसाधारण,  प्रभाग  ७- अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महीला, प्रभाग ८- अ) अनुसूचित जाती महीला, ब) सर्वसाधारण, प्रभाग ९- अ) अनुसूचित जाती, ब)  सर्वसाधारण महीला, प्रभाग १०- अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महीला,  प्रभाग ११- अ) अनुसूचित जाती महीला, ब) सर्वसाधारण,  

प्रभाग १२-  अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला, ब) सर्वसाधारण, प्रभाग १३- अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महीला. प्रभाग १४- अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महीला. प्रभाग १५- अ ) अनुसूचित जाती महीला , ब) सर्वसाधारण असे आरक्षण चिठ्ठीद्वारे जाहीर  केल्याचे  संबधीत अधिकाऱ्यांनी सांगितले  यावेळी शहरातील अनेक उत्साही नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply